महा.लोकसंवाद न्यूज
मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
दिनांक ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने भातरुमंडळ मलकापूर येथे राज्यस्तरीय पत्रकार संमान सोहळा आयोजित करण्यात आला
कार्यक्रम साठी जळगाव भुसावळ बोदवड जामनेर चाळीसगाव नांदुरा खामगाव बुलढाणा येथुन पत्रकार बांधव संपादक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खामगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक तसेच मलकापूर तहसीलदार राहुल तायडे समतेची निळे वादळ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे या मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी पत्रकारांच्या निर्भीड लेखणीचा गौरव करत सामाजिक बांधिलकीसाठी त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत मांडले पुरस्कार वितरण सोहळ्यात अशोक थोरात साहेबांनी पत्रकारितेचे महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत पत्रकार हे समाजाचा आरसा असून त्यांच्या मेहनतीमुळे समाजातील समस्यांना वाचा फोडली जाते असे गौरवउद्गार काढले. या सन्मानामुळे पत्रकारांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून या क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी त्यांना नवीन ऊर्जा मिळेल तसेच भाई अशांत वानखेडे यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकारांनी न डगमगता आपली भूमिका स्पष्ट मांडावी व आपल्या लेखणीतून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा आपली असे अशांतभाई वानखेडे यांनी सांगितले
राज्यस्तरीय व्यासपीठावर बोदवडच्या आणि भुसावळच्या पत्रकारांनी आपली चमकदार ओळख प्रस्थापित करत पत्रकारिता या क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचे हे सन्मानपत्र भविष्यातील दिशादर्शक ठरेल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले
खालील पत्रकारांचे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
१)प्रकाश सुरवाडे मुख्य संपादक महा.लोकसंवाद न्यूज (भुसावळ)
२)प्रमोद बावस्कर (भुसावळ)
३) सुनील पाटील (भुसावळ)
४) अनिल सुरवाडे (वरणगाव)
५) संदीप सुरवाडे वरणगाव)
तसेच बोदवड तालुक्यातील
१) संजय तायडे जीएस नाईन न्यूज जिल्हा प्रतिनिधी जळगाव
२) युवराज तायडे जिल्हा संघटक हिंदी मराठी पत्रकार संघ
३) नितीन सुरवाडे जीएस नाईन न्यूज नाशिक विभागीय प्रतिनिधी
४) रामेश्वर लोहार उपसंपादक
महा.लोकसंवाद न्यूज
५)राजु शेजोळे हिंदी मराठी पत्रकार संघ बोदवड तालुका उपाध्यक्ष
या सर्वांची राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्यामुळे त्यांचं विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

No comments:
Post a Comment