महा लोकसंवाद न्यूज
मुंबई (प्रतिनिधी)
निर्माता विशाल वाघ यांच्या माया ममता या चित्रपटाला दिग्दर्शक मुकेश कनेरी मार्फत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित
हिंदी असो की मराठी चित्रपटा साठी उत्कृष्ट काम केल्या बद्दल
च्या कर्तृतवाला अनुरूप चित्रपट सृष्टी तून माना सन्मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो . या उत्सवाचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते आदरणीय मुकेश जी कनेरी असून त्यांच्या हस्तक्षेपाने खूप मोठे मोठे दिग्गजांची आजपर्यंत पुरस्कारा साठी वर्णी लागलेली आहे. नाशिकला संपन्न झालेल्या या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्याला काही कारणा निमित्ताने माया ममता,येणारा मराठी चित्रपट, त्या चित्रपटाचे निर्माता /दिग्दर्शक /गीतकार विशाल वाघ साहेब काही कारणामुळे हजर नसल्या ने, कलाकारां च्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे निर्माता /दिग्दर्शक मुकेश जी कनेरी ह्यांनी आपल्या मुंबई स्थित रहेजा विहार ला आमंत्रित करून दिग्दर्शक, अभिनेता अण्णा हंडोरे च्या हस्ते पुरस्कार देऊन माया ममता कन्सेप्ट चा गौरव केला. चित्रपटा साठी प्रदीर्घ चाललेल्या या चर्चे मधून निर्माता दिग्दर्शक आणि काय केले पाहिजे की जेणेकरून रसिक वर्ग आपला होईल या संदर्भात आदरणीय कनेरी साहेबांनी भरपूर मार्गदर्शन केले. येणाऱ्या ह्या चित्रपटाची कहाणी चित्त थरारक असून भावनाप्रधान आहेच पण तरुण वर्गाला खुर्चीला खीळवून ठेवणारे , गीतकारा च्या लेखणीतून उतरलेले केसावर फुगे फेम अण्णा सुरवाडे यांनी गायलेले, सोबत गायत्री चौधरी, मंगेश शिर्के आणि संचिता मोरजकर ह्यांच्या गोड आवाजात, संगीतकार अशोक दादा वायंगणकर यांच्या संगीताची जादू या कर्ण मधुर गीतां मधून प्रेक्षकांना भुरळ घालणार आहेत या शब्दांमध्ये कनेरी साहेबांनी ह्या कथेचे कौतुक केले. अभिनेता सुनील काटे, दीपक पाटील, गजानन खोडके, विशाल भोई, नवराज तायडे, कवयित्री सुनिता तायडे, सुदर्शन खराटे, बलराज आहूजा, कॅमेरामन शाहरुख शेख, राजू गुरचळ, सहदिग्दर्शक रामेश्वर लोहार यांच्या शुभेच्छा सहित या वेळेस रेवा इंटरटेनमेंट च्या
कु. रेवा मुकेश कनेरी ह्यांनी माया ममता च्या यशस्वीते साठी शुभेच्छा प्रदान केल्या. तर निर्मात्यां चे चित्रपट मार्केट ला आल्या नंतर सत्कार सोहळे होतात च आणि पुरस्कार ही दिल्या जातोच पण मला दिला गेलेला पुरस्कार हा आंतर राष्ट्रीय असून दादा साहेब फाळके हा खूप मोठा पुरस्कार आहे, हे माझे सौभाग्य असुन साहेबांनी मला व माझ्या कथेला त्या योग्यतेची मान्यता दिली. म्हणून मी मुकेश जी कनेरी साहेबांचा ऋणी आहे या शब्दात मी आभार मानत आहे. असे निर्माता निर्देशक गीतकार यांनी यावेळी जाहीर केले.


No comments:
Post a Comment