सत्यशील परबत तायडे यांचा उपोषणाचा इशारा
महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी (बोदवड )
मनुर खुर्द तालुका बोदवड येथील अतिक्रमित रस्ते मोकळे करा अशा प्रकारचे निवेदन दिनांक ८/१/२०२५ रोजी बोदवड गटविकास अधिकारी यांना देण्यात आले
सविस्तर असे की मनुर खुर्द गावातील गावकुसातील रस्ते मोकळे करून मिळण्याबाबतचा अर्ज ग्रामपंचायत कार्यालय मनुर खुर्द यांना दिनांक २८/ ९/ २०२५ रोजी दिला होता तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांना मौजे मनुर खुर्द येथील ग्रामस्थांच्या आलेल्या अर्जावरून गावकुसातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबतचा अर्ज सुद्धा दिलेला आहे या दोन्ही अर्जावर आज पर्यंत ग्रामपंचायत मनुर खुर्द व पंचायत समिती बोदवड यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही त्या कारणास्तव श्री सत्यशील परबत तायडे राहणार मनुर खुर्द तालुका बोदवड यांनी पंचायत समिती कार्यालय बोदवड येथे दि.१४/१/२०२५ रोजी उपोषण करणार अशा प्रकारचे निवेदन गटविकास अधिकारी यांना दिले
सदर अर्जानुसार कारवाई करुन तसा अहवाल अर्जदार यांना सादर करावा अशा प्रकारची विनंती करण्यात आली
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
मो. 9595755097

No comments:
Post a Comment