वरणगाव येथे रमाई जयंती निमित्त मिरवणुकीत दगडफेक करणाऱ्या जातीयवादी समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्यासाठी वरणगाव पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा - MHL News

Breaking

Saturday, 8 February 2025

वरणगाव येथे रमाई जयंती निमित्त मिरवणुकीत दगडफेक करणाऱ्या जातीयवादी समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्यासाठी वरणगाव पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा

 



महा.लोकसंवाद न्यूज (जळगाव)

मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)


आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी वरणगाव पोलीस स्टेशन वर बौद्ध समाज बांधवांकडून भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व जगन भाई सोनवणे संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष कामगार नेते यांनी केले तर मोर्चामध्ये आरपीआयचे नेते भगवान भाऊ सोनवणे माजी नगरसेवक मिलिंद मेढे आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष संजय तायडे अनिल सुरवाडे नितीन सुरवाडे पत्रकार व समाज बांधव महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या 


वरणगांव येथे रमाई मात जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत काही जातीयवादी लोकांनी दगडफेक केली.


घटना अशी घडली 


दि. 07 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9:30 वाजता सिद्धेश्वर नगर येथील गणपती मंदिराजवळ ही घटना घडली. रमाई माता जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत साउंड सिस्टीम ऑपरेटर आकाश निमकर यांनी भीमगीते वाजवली. त्यावर जातीयवादी लोकांनी (आरोपी)त्याला जबरदस्ती खाली उतरवले आणि तू छत्रपती शिवाजी महाराज चौकात भीमगीते का वाजवतो असे विचारत शिवीगाळ करून मारहाण केली.


यानंतर, भोला रामा इंगळे यांनी याला विरोध केला असता आरोपींनी "बंद करा महारांचे गाणे, आम्ही या सगळ्यांना पाहून घेतो," असे म्हणत संपूर्ण मिरवणुकीवर दगडफेक केली. या दगडफेकीत ट्रॉलीवर ठेवलेल्या रमाई माता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीच्या पायाजवळ दगड लागल्याने मूर्तीचे नुकसान झाले.



या प्रकरणी आशाबाई कैलास बि-हाडे (वय 45, रा. सिद्धेश्वर नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निलेश काळे, निलेश पवार, कृष्णा माळी, गोपाळ माळी, गोपाळ राजपूत आणि इतर 10 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




या घटनेप्रकरणी वरणगांव पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गु.र.नं. 018/2025 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 189(1), 189(2), 189(3), 189(4), 118(1), 299 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कलमे लागू करण्यात आली आहेत.

No comments:

Post a Comment