आचेगाव शिवारात बिबट्या चा वावर नागरिक भयभीत - MHL News

Breaking

Thursday, 3 September 2026

आचेगाव शिवारात बिबट्या चा वावर नागरिक भयभीत

 


आचेगाव ता भुसावळ येथे काही दिवसांपासून बिबट्या चा मुक्त संचार सुरू असुन येथील नागरिक भयभीत झाले आहे 


सविस्तर असे की आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी आचेगाव येथील रहिवासी पत्रकार प्रकाश सुरवाडे सकाळी ६.३० वाजता फिरायला गेले असता दोन बिबटे गोळेगाव रस्त्याने आचेगाव येथील शेतकरी चंदु चौधरी यांच्या शेतामध्ये जात असताना थोड्या अंतरावर दिसले 


मागील काही दिवसापूर्वी याच ठिकाणी दोन कुत्र्यांचा फडशा बिबट्यांनी फाडला होता त्यामुळे येथील नागरिक व शेतकरी शेतमजूर पूर्ण भयभीत झाले असून वन विभाग याच्यावरती काय उपाययोजना करतो असा प्रश्न येथील नागरिकांना पडलाय तरी वन विभाग मुक्ताईनगर यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा नाहीतर कोणतीही दुर्घटना घडू शकते

No comments:

Post a Comment