अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात जळगावात ४ ऑक्टोबरला भव्य 'महामोर्चा' - MHL News

Breaking

Thursday, 3 September 2026

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात जळगावात ४ ऑक्टोबरला भव्य 'महामोर्चा'

 


महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी रविवार, ६ सप्टेंबर रोजी जळगावात विशेष नियोजन बैठक

जळगाव: जिल्हा प्रतिनिधी

अनुसूचित जातीच्या (SC) उपवर्गीकरणाविरोधात राज्यभरात तीव्र असंतोष पसरला असून, या निर्णयाच्या विरोधात जळगाव जिल्ह्यात येत्या ४ ऑक्टोबर रोजी भव्य 'महामोर्चा' काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

.  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वात हा महामोर्चा निघणार असून, या मोर्चाला प्रा. जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री बबनराव घोलप आणि ॲड. अमन आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

  

या ४ ऑक्टोबरच्या ऐतिहासिक महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आणि रूपरेषा आखण्यासाठी रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता, पद्मालय विश्रामगृह, जळगाव येथे जिल्हास्तरीय विशेष नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

    

अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करून समाजातील ऐक्य तोडण्याचा आणि घटनात्मक हक्क कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. या विरोधात ४ ऑक्टोबरच्या महामोर्चात संपूर्ण जिल्ह्यातून समाजबांधव, चळवळीतील कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे 59 प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत

.  

तरी ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या नियोजन बैठकीस जळगाव जिल्ह्यातील सर्व सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि समाजबांधवांनी वेळेवर व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment