प्रतिनिधी /भुसावळ
आज भुसावळ तालुक्यातील एकुण 39 ग्रामपंचायतीमध्ये सन 2011 च्या जनगणने नुसार भुसावळ तालुक्यातील ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादे पेक्षा नागरिकांचा मागास प्रवर्ग करीता पद जास्त होत असल्याने त्या ठिकाणी नागरिकांचा प्रवर्ग मधुन सर्वसाधारण करीता पद देय होत असल्याने नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गनिहाय सरपंच पदाचे आरक्षण सोडत सभा आज सकाळी 11.00 वाजता तहसिलदार भुसावळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली
नागरीकांचा मागास प्रवर्ग यासाठी ४ जागा निश्चित करण्यात आलेल्या असुन त्यापैकी तळवेल ग्रामपंचायत करीता सरपंच पदाचे आरक्षण थेट पणे देण्यात आले. तसेच उर्वरित पात्र ग्रामपंचायत वराडसिम, मन्यारखेडे, शिंदी, वेल्हाळे, कंडारी व ओझरखेडा या ६ ग्रामपंचायतीमधुन तीन चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यामध्ये वराडसिम, मन्यारखेडे व ओझरखेडा या ग्रामपंचायतीच्या चिठठ्या बालक नामे शिव आकाश कोळी वय ६ वर्ष यांनी काढल्या त्यानुसार नागरीकांचा मागास प्रवर्गाकरीता तळवेल, वराडसिम, मन्यारखेडे व ओझरखेडा या चार ग्रामपंचायती आरक्षीत झालेल्या आहेत.
तसेच भुसावळ तालुक्यात सर्वसाधारण प्रवर्गा करीता २० ग्रामपंचायती आरक्षित झालेल्या आहेत. त्या ग्रामपंचायती अनुक्रमे १) काहुरखेडा-मानपुर, २) पिंप्रीसेकम निंभोरा बु. ३) सुसरी, ४) जोगलखेडा- भानखेडा, ५) सुनसगांव- गोभी, ६) गोजोरा, ७) मोढाळे, ८) पिंपळगांव बु.. ९) साकेगांव, १०) मांडवेदिगर- भिलमळी, ११) अंजनसोंडे, १२) कन्हाळे खु., १३) बोहडी चु. बोहडर्डी खु., १४) बेलव्हाळ, १५) जाडगांव, १६) कठोरे बु. १७) कठोरे खु. १८) शिंदी, १९) वेल्हाळे व २०) कंडारी या ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गाकरीता आरक्षीत झालेल्या आहेत.
अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण जैसे थे ठेवण्यात आलेले आहे
तसेच नागरीकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण करीता महिलासांठी 50 टक्के आरक्षण सोडत सभा दिनांक ०८/०९/२०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता ताप्ती सभागृह भुसावळ, उपविभागीय अधिकारी भुसावळ भाग कार्यालय येथे आयोजीत केलेली आहे. सदर सभेस गावातील ग्रामस्य ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन तहसिलदार भुसावळ यांनी केले आहे,

No comments:
Post a Comment