भुसावळ: फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महापुरुषांचा अपमान, महिलांविषयी अत्यंत अश्लील वक्तव्ये आणि समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूषण भास्कर पाटील याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करून त्याला तातडीने जिल्ह्यातून तडीपार करावे, अन्यथा संपूर्ण जिल्ह्यात ‘जेल भरो’ आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
आरोपी भूषण भास्कर पाटील (रा. डोंबिवली, जि. ठाणे) याने ६ आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी फेसबुक लाईव्हद्वारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत नीच आणि अर्वाच्य भाषेत विधाने केली. तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याची जाहीर धमकी देऊन कोट्यवधी अनुयायांच्या भावना दुखावून कायदा-सुव्यवस्थेला आव्हान दिले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR No. 0040/2026) दाखल झाला आहे.
आरोपीने केवळ महापुरुषांचाच अपमान केला नाही, तर स्त्रियांविषयी अत्यंत लज्जास्पद आणि अश्लील भाषेत टिपणी केली आहे. तसेच राज्याचे मंत्री ना. संजय सावकारे व त्यांच्या कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी ५ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत.
रिपब्लिकन सेनेने निवेदनाद्वारे भुसावळ चे डी वाय एस पी यांच्याकडे खालील मागण्या मागण्या प्रकारच्या मागण्या केल्या आहे
१) आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याच्यावर तात्काळ 'मोक्का' लावावा आणि जिल्हाबंदी (तडीपारी) करावी.
२) आरोपीचे फेसबुक अकाउंट कायमस्वरूपी ब्लॉक करण्यासाठी सायबर सेलने तातडीने पावले उचलावीत.
३) माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६७ आणि महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी वाढीव कलमे लावण्यात यावीत.
४) हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी.
"प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून २ दिवसांच्या आत आरोपीला जेरबंद करावे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीला वेळीच ठेचले नाही, तर रिपब्लिकन सेना आणि सर्व समाज बांधव जिल्ह्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करतील."— विनोद सोनवणे (जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन सेना, जळगाव)
निवेदन देताना
विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष
दिनेश इखारे जिल्हा नेते
वंदनाताई सोनवणे महिला सेना जिल्हाध्यक्षा
वंदनाताई आराक जिल्हा महासचिव
देवदत्त मकासरे मेजर जिल्हा उपाध्यक्ष
राजश्री ताई सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष
बंटी नरवाडे

No comments:
Post a Comment