पिंपळगांव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ज्ञानदेव निना सरोदे यांच्या वतीने वृक्षारोपण !! - MHL News

Breaking

Thursday, 20 August 2026

पिंपळगांव बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ज्ञानदेव निना सरोदे यांच्या वतीने वृक्षारोपण !!

 


प्रतिनिधी /प्रमोद बावस्कर


भुसावळ तालुक्यातील पिंपळगांव बुदुक प्राथमिक विद्या मंदिर शाळा येथे दि . 20 रोजी युवा समाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव सरोदे यांच्या वतीने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले मुख्यध्यापक , शिक्षिका व विद्यार्थी यांनी मोठ्या सहभाग घेतला शाळेचे सुशोभिकीकरण तसेच पर्यावरण संतुलन साठी शाळेत विविध वृक्षरोपण करण्यात आले


ज्ञानदेव सरोदे यांच्या कडून नेहमीच अशी समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात शाळेच्या वृक्षरोपण वेळी ज्ञानदेव निना सरोदे यांनी शाळेसाठी लागेल तेवढे वृक्ष यापुढे माझा वतीने मिळतील अशी गवाही याप्रसंगी दिली .वृक्षारोपण आयोजीत कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित शालेय समिती अध्यक्ष कृष्णा उखा पाटील , उपअध्यक्ष विलास सोनवणे , गुलाबसिंग विठोबा पाटील मा . दूध उत्पादक संघ संचालक , शिवसेना शाखा अध्यक्ष प्रशांत नामदेव सपकाळे उपसरपंच जितेंद्र पाटील माजी . ग्रा.प सदस्य सुभाष मावळे , विविध सहकारी सोसायटी सदस्य जयराम झटके , समाधान सरोदे ,यमुना सरोदे, भावी ग्रा. पंचायत सदस्य सागर पाटील , भावी ग्रा.प. सदस्य सागर बावस्कर तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते

No comments:

Post a Comment