*वैशालीताई सुर्यवंशी यांचा निर्धार : मविआ बैठकीत सत्ताधार्यांविरूध्द एल्गार*
*पाचोरा, दिनांक ८ (प्रतिनिधी )* : लोक जाहीरपणे बोलत नसले तरी भाजप सरकारच्या विरोधात मोठी खदखद आहे. यातच उध्दव साहेबांसोबत झालेली गद्दारी ही लोकांना आवडली नसून आगामी निवडणुकीत याचे प्रतिबिंब उमटणार आहे. याला आपल्या परिश्रमांची जोड मिळून करण पवार यांना पाचोरा-भडगाव मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळणार असल्याचा निर्धार शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. त्या मविआ बैठकीत बोलत होत्या.
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करणदादा पवार यांना उमेदवारी दिली असून ते मविआच्या माध्यमातून मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासाठी पाचोरा-भडगाव मतदारसंघातून वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली जय्यत तयारी करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज महाआघाडी चे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महाआघाडीचे उमेदवार करणदादा पवार व ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीच्या प्रारंभी करणदादा पवार यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांना पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पदाधिकार्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विविध पदाधिकार्यांनी आपल्या मनोगतातून करणदादा पवार यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाआघाडी उमेदवार करणदादा पवार यांनी आपल्या मनोगतातून पाचोरा-भडगाव मतदारसंघ हा मूळ शिवसेनेवर प्रेम करणार असून दिवंगत आर. ओ. तात्यांच्या माध्यमातून येथे तळागाळापर्यंत पक्षाचे संघटन मजबूत असून आगामी निवडणुकीत येथून मोठ्या संख्येने मतदान होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाकडे पैसा आणि अफवा असून याच्या बळावर ते लोकांना संभ्रमीत करण्याचा प्रयत्न करतील. तथापि, सूज्ञ जनता याला बळी पडणार नसल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले.
याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधार्यांवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या की, राज्यात उध्दव ठाकरे साहेबांचे सरकार हे जनहिताचे काम करत असतांना त्यांच्या सोबत गद्दारी झाली असून जनतेला हे आवडलेले नाही. आज भाजपकडे मोठी ताकद असल्याने लोक बोलत नाहीत, तथापि, जनतेमध्ये सरकारबाबत मोठी चीड असून निवडणुकीत याचा नक्कीच परिणाम होणार आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघातून आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात झटून प्रयत्न करावयाचे आहेत. सर्वांनी भल्या पहाटेपासून ते रात्रीपर्यंत नियोजनपूर्वक प्रचार करून जनतेपर्यंत आपला विचार घेऊन जावा. आपली मशाल ही इतकी प्रज्वलीत झाली पाहिजे की, यातून मतांचा अक्षरश: पाऊस पडला पाहिजे. असे झाल्यास अन्य कुठल्याही मतदारसंघातून मिळणार नाही इतके मताधिक्य आपण करणदादा पवार यांना पाचोरा-भडगावातून देऊ अशी ग्वाही वैशालीताई सुर्यवंशी यांनी याप्रसंगी दिली.
दरम्यान, निवडणुकीच्या काळात सर्वांनी सजग राहण्याची गरज असून विशेष करून सोशल मीडियावर आपण आपल्या उमेदवाराचा प्रचार करावा. आपल्याला कुणावर अनाठायी टिका करायची नसून फक्त आपल्या पक्षाचा आणि उमेदवाराचा विचार हा जनतेपर्यंत घेऊन जायचा असल्याचे वैशालीताई सुर्यवंशी यांनी ह्यावेळी आवर्जून नमूद केले.
काँग्रेसचे नेते नंदू भाऊ सोनार, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण पाटील, शिवसेना चे ज्येष्ठ नेते अरुण पाटील आणि एडवोकेट अभय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी उद्धव भाऊ मराठे .राजेंद्र गडबड पाटील. अरुण भाऊ पाटील . रमेश जी बाफना राजेश भाऊ काले एडवोकेट अभय पाटील, संतोष पाटील, भरत भाऊ खंडेलवाल, पप्पू भाऊ राजपूत, विकास भाऊ वाघ, दादाभाऊ चौधरी. अनिल सावंत, बाळू अन्ना, राजेन्द्र पाटिल, आनंद संघवी, पप्पू जाधव. राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल. संजय चौधरी. हरिभाऊ पाटील गफफार भाई शेख. नामदेव चौधरी. ज्ञानेश्वर भाऊ चौधरी. संदीप जैन, शशी पाटील, भूपेश सोमवंशी, गौरव पाटील, हरीश देवरे, मनोज चौधरी, निखिल सोनवणे, प्रितेश जैन, संदीप सिसोदिया. सागर पाटील जयश्री येवले अनिता पाटील कुंदन पंड्या द्वारका सोनवणे सह भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एडवोकेट अविनाश भालेराव नंदू भाऊ सोनार संभाजी ब्रिगेडचे प्रवीण पाटील जिभाऊ पाटील आणि क्षत्रिय ग्रुपचे डी एन पाटील राजू बाबाजी ठाकरे, जनार्दन पाटील, एडवोकेट भोईटे अन्ना, बंडू मोरे सह शिवसेना पक्षाचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ तर आभार पप्पू दादा राजपूत यांनी केले.
महा.लोकसंवाद न्यूज
मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment