आचेगांव येथील ग्रामसेवकाची बदली करा .ग्रामस्थांची मागणी - MHL News

Breaking

Sunday, 22 March 2026

आचेगांव येथील ग्रामसेवकाची बदली करा .ग्रामस्थांची मागणी

 



महा लोकसंवाद न्यूज/प्रतिनिधी 


आचेगांव ता . भुसावळ येथील ग्रामसेवक श्री राहुल नेहते यांची येथून बदली करा अशी मागणी दि.18/3/2026 रोजी येथील ग्रामस्थांनी भुसावळ येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे 

सविस्तर वृत्त असे की आचेगांव येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक श्री. राहुल नेहते हे ग्रामपंचायत मध्ये येत नाही कधी आले तर चार वाजता मद्ये प्राशन करून येतात व ग्रामपंचायत मध्ये धूम्रपान करत असतात कोणीही त्यांच्याकडे कामासंदर्भात गेले असता त्यांना अरेरावीचे भाषा करत असतात व महिला गेल्या असता त्यांना अश्लील शब्दांचा उच्चार करतात. या कारणास्तव ग्रामपंचायतचे कुठलेही जनहिताचे काम होत नाही सरपंच यांचा कार्यकाळ संपलेला आहे.


ग्रामसेवक हे देखील ग्रामपंचायत मध्ये येत नसल्याने ग्रामपंचायत ही वाऱ्यावर सोडलेली आहे सर्व गावकरी मंडळी ह्या ग्रामसेवकाला त्रस्त झाली असल्यामुळे संबंधित ग्रामसेवकाची हाकलपट्टी करून या ठिकाणी नवीन ग्रामसेवकाची नेमणूक करावी ही विनंती वजा मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे 


ग्रामसेवकाची बदली तात्काळ न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिलेला आहे

No comments:

Post a Comment