महा लोकसंवाद न्यूज
तालुका प्रतिनिधी भुसावळ
आज दिनांक 11 डिसेंबर रोजी जळगांव जिल्हा संघटनात्मक बांधणी बैठक अष्टभुजा फॅमिली रेस्टॉरंट जवळ भुसावळ येथे दुपारी 01 वाजता मोठ्या उत्साहात पार पडली.
या बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
या प्रसंगी बैठकीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी सांगितले रिपब्लिकन सेना जिल्हा बैठक संघटनात्मक बळकटी देण्यासाठी महत्वाची आहे आता लवकरच सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीत जळगांव येथे मोठा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे त्याकरिता कामला लागा असे आवाहन केले
यावेळी कामगार सेना जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा नेते दिनेश इखारे, रिपब्लिकन महिला सेना जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे, महिला सेना जिल्हा महासचिव वंदनाताई आराक यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष मेजर मकासरे,जिल्हा संघटक प्रमोद बावस्कर,स्वप्नील सोनवणे,बंटी सोनकांबळे, हेमंत सोनवणे यांनी परिश्रम घेतले
याप्रसंगी राजश्री सोनवणे,वर्षा सपकाळे, शर्मिला तायडे,मिना भालेराव, प्रमोद बावस्कर, संदिप सोनकांबळे, रविंद्र मोरे(जामनेर), संदिप सुरवाडे (तळवेल), सुरेश बोदोडे (यावल) यांच्यासह अनेक महिला व तरुणांनी रिपब्लिकन सेने मध्ये प्रवेश केला
तसेच यावेळी राजेंद्र बारी,हमिद तडवी(यावल), हेमंत सोनवणे (जळगांव), दिलीप भालेराव, आकाश बागुल (भुसावळ),वाल्मिक लोखंडे (भडगांव), दाजिबा गव्हाणे,पुनमचंद निकम (अमळनेर) सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी सुत्रसंचलन जिल्हा संघटक प्रमोद बावस्कर यांनी केले व आभारप्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष मेजर मकासरे यांनी मानले

No comments:
Post a Comment