मुक्ताईनगर पोलिस उपविभागीय अधिकारी यांना भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेचे निवेदन
महा लोकसंवाद न्यूज
तालुका प्रतिनिधी (मुक्ताईनगर)
आज दिनांक 2/ 9 /2025 रोजी ठीक बारा वाजता मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्या कार्यालयात जाऊन भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य भारत सरकार मान्यता प्राप्त या संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल भाऊ व्हिनमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र राज्याचे मुख्य कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू रामेश्वर जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत
व संघटनेचे सिल्लोड विभागीय अध्यक्ष संजय चौतमाल व महा लोकसंवाद न्यूज चे संपादक प्रकाश सुरवाडे नाना महाजन व संघटनेचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष बाबुराव बोंडे जिल्हा प्रवक्ता संतोष महाराज चिकटे व साहेबराव घटे जिल्हा सचिव व संघटनेचे सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते
मुक्ताईनगर बोदवड सावदा वरणगाव या परिसरात दारू जुगार सट्टा पत्ता व इतर सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद व्हावे यासाठी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदन दिल्यानंतर 21 दिवसाच्या आत जर धडक कारवाई न केल्यास किंवा या निवेदनाचा विचार न केल्यास संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचे मुख्य कार्याध्यक्ष शेख गुलाब मामु व जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार यांनी सांगितले कारण गोरगरीब जनता शैक्षणिक खर्च इतर खर्च पाहता त्रस्त आहे व्यसनांमुळे खूप घरे बरबाद होत असून यामुळे येणाऱ्या पिढीवर जे संस्कार होत आहे व या परिसरात अवैध धंदे करणारे खूप आपले वेगवेगळे डोके चालवून कशाप्रकारे सर्व धंदे करीत आहे आतापर्यंत पोलीस प्रशासन फक्त नावालाच आहे परंतु अशी ठोक कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही यासाठी भारत सरकार मान्यता प्राप्त भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेच्या वतीने लवकरच अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने दिला

No comments:
Post a Comment