सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा - MHL News

Breaking

Thursday, 2 January 2025

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा

  



महा.लोकसंवाद न्यूज 

मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)


आज दिनांक ३ जानेवारी आज सावित्रीबाई फुले जयंती आहे ती पुर्ण महाराष्ट्र आणि देशात साजरी केली जाते 


त्यांच्याबद्दल थोडी माहिती 

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला 

खंडोजी नेवासे पाटील हे त्यांचे वडील आणि लक्ष्मी त्यांची आई ती त्यांच्या वडिलांची मोठी मुलगी होती सावित्रीबाई त्यांच्या सुरुवातीच्या काळात एक सामान्य मुलगी होती खेडकर आणि हासरी होती पण जसा जसा काळ गेला तसा तसा त्यांना आचर्यकारक गोष्टीचा सामना करावा लागला


सावित्रीबाई फुले या मराठी कवित्री समाज सुधारक आणि शिक्षका होत्या त्यांनी व त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिला हक्क आणि शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले मुलींच्या शाळेत सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्या आजच्या जगातील जगातील मराठी महाकाव्यांची अग्रदूत कवित्री म्हणून ओळखल्या जातात


सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांबद्दल चूल आणि मूल ही भावना मोहित काढून स्त्रि शिक्षणाचा पाया रोवला आणि स्त्रियांना सन्मानाचे जीवन मिळवून दिले 

आजची महीला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही स्त्रियांची जीवनशैली त्यांनी पूर्णपणे बदलून टाकली 

अशा भारतातील प्रथम शिक्षिका प्रथम मुख्याध्यापिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

No comments:

Post a Comment