मानमोडी ता बोदवड येथील पाणीपुरवठा योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचार संदर्भात बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल - MHL News

Breaking

Thursday, 30 January 2025

मानमोडी ता बोदवड येथील पाणीपुरवठा योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचार संदर्भात बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

 


महा.लोकसंवाद न्यूज (जळगाव)

मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)


मानमोडी तालुका बोदवड येथील पाणीपुरवठा योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचार करणाऱ्यांवर बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल 

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक २६ जानेवारी रोजी मानमोडी तालुका बोदवड येथील सरपंच सौ.पुनम मोहन पाटील व ग्रामपंचायत सदस्य व काही गावकरी मंडळी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले होते काल दिनांक 29 रोजी त्यांच्या उपोषणाची दखल मंत्री गिरीश भाऊ महाजन व आमदार चंद्रकांत पाटील यांनी घेतली त्या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ कार्यकारी अभियंता जळगाव यांना गुन्हे दाखल करण्याचा सूचना दिल्या त्या अनुषंगाने 

कार्यकारी अभियंता जळगाव यांनी बोदवड चे अभियंता श्री तायडे यांना गुन्हा दाखल करण्याच्या लेखी सुचेना दिल्यामुळे बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला 


सदर काय आहे भ्रष्टाचार प्रकरण   



मौजे मानमोडी ता बोदवड पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती देखभाल योजना सन २०१६-१७ मधील


केलेल्या कामासंबंधातील तक्रारी दाखल झाल्या 


वरील संदर्भीय विषयास अनुसरुन मानमोडी पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती देखभाल व दुरुस्ती सन २०१६-१७ ही योजना जिल्हा परिषद जळगांव देखभाल व दुरुस्ती अंतर्गत २०१६ मध्ये मंजुर झालेली होती, सदर योजनेला प्रशासकीय मान्यता रु.१४.०२.३७०/ इतक्या रक्कमेचे असुन सदर कामासाठी कार्यर्यान्वयीत यंत्रणा ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ही होती.


उप अभियंता बोदवड यांच्या अहवालानुसार सदर योजनेत अनियमीतता झालेली असुन समितीला जिल्हा परिषदे मार्फत वर्ग केलेल्या रक्कमेपेक्षा कमी रक्कमेचे काम झाले आहे, समितीस योजनेसाठी दिलेली रक्कम व झालेल्या कामाचे मुल्याकंन यामध्ये रक्कम रु.२,७२,३८३/- मात्र रक्कमेचा फरक दिसुन येत आहे. सदर बाबत सरपंच ग्रामपंचायत मानमोडी यांनी वेळोवेळी तक्रार दाखल केली असुन सदर तक्रारीच्या अनुषगाने सदर कामात प्रत्यक्ष कामापेक्षा जास्त रक्कम रु.२.७२,३८३/- मात्र अपहार केल्याचे दिसुन येत आहे


यास्तव सतीश ज्ञानेश्वर पाटील अध्यक्ष ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती मानमोडी ता. बोदवड जि. जळगांव व सौ प्राजक्ता प्रशांत पाटील सचिव ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समिती मानमोडी यांच्यावर कार्यकारी अभियंता जळगाव यांच्या आदेशानुसार बोदवड चे अभियंता श्री तायडे यांनी गुन्हा दाखल केला 


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो ९५९५७५५०९

No comments:

Post a Comment