विज दरवाढ रद्द करून २०० युनिट पर्यंत विज बिल माफ करा - MHL News

Breaking

Wednesday, 29 January 2025

विज दरवाढ रद्द करून २०० युनिट पर्यंत विज बिल माफ करा

 


गरीब शोषित श्रमिक समाज संघर्ष समिती ची ऊर्जामंत्री यांच्या कडे निवेदना द्वारे मागणी


महा.लोकसंवाद न्यूज (जळगाव)

मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)


आज दिनांक २९/०१/२०२५ रोजी बोदवड येथील कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि कं बोदवड द्वारा राज्याचे उर्जा मंत्री यांच्या कडे निवेदना द्वारे मागणी 


बोदवड येथील गरीब शोषित श्रमिक समाज संघटनेने खालीलप्रमाणे मागण्या केलेल्या आहे 


विज दर वाढ रद्द करणे व २०० युनिट पर्यंत विज बिल माफ करणे 


१) महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात विज दर वाढ झाल्यामुळे सामान्य माणसाचे आर्थिकदृष्ट्या कंबर मोडले आहे या दरवाढीचा निषेद करण्यात येत आहे.


२) सदर विज दर वाढ रद्द करण्यात यावी.


३) २०० युनिट पर्यंत विज बिल माफ करण्यात यावे.


४) थोडा वारा पाऊस आला की दीज जाते (बत्ती गुल होते) हा प्रकार घडू नये म्हणून पावसाळ्यापूर्वी तसेच वेळोवेळी मेंनटन्सचे कामे करून घ्यावे.


५) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ने अनेक वेळा मीटर मध्ये बदल करून वीज चोरी रोखण्याचा प्रचल केला आहे पण कंपनी वीज चोरी रोखण्यास अपयशी ठरली आहे उलट सामान्य, गरीव व इमानदार ग्राहकांना वेळो वेळी होणार्या मीटर बदलाच्या खर्चाचा बोजा सोसावा लागतो, वीज चोरीस कंपनीतील काही कर्मचारीच मदत करतात, अधून मधून थोड्याफार लोकांची चोरी पकडून अल्पशी दंडात्मक कारवाई केली जाते, त्यामुळे वीज चोरीला आळा बसत नाही.


शासन आणि कंपनी एका प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालून त्यांच्याकडून हप्ते वसूल करते तर दुसरी कडे विजेचे दर वाढवून सामान्य, गरीब व इमानदार ग्राहकांना शोषण करत आहे. विज चोरी रोखण्यात यावी. वीज चोरीस मदत करण्याऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचार्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.


सदर आमच्या मागण्याकडे लक्ष देवून जनतेचे हित साधावे करीता निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देतानां 


अध्यक्ष 

बी डी इंगळे सर

इंजिनियर महासेन सुरडकर 

भगवान तायडे 

प्रमोद धामोळे

शे अक्रम शे इब्राहिम 

राजेश बोदडे पत्रकार 

यांची उपस्थिती होती 


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment