भाई दिपक केदार यांची मागणी
आज दिनांक 10 रोजी वरणगाव येथे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष भाई दीपक केदार आले असता त्यांनी ही मागणी केली
याबाबत माहिती अशी की दिनांक सात रोजी माता रमाई जयंती निमित्त वरणगाव ता.भुसावळ येथील सिद्धेश्वर नगर येथे मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक साडेनऊ वाजेच्या सुमारास निघाली त्यावेळी काही जातीवादी समाजकंटक भीम गीते लावू नका असे सांगितले व त्यांनी प्लॅनिंग नुसार एका घराच्या गच्चीवर जाऊन मिरवणुकीवर दगडफेक केली यावेळी महिला युवक आणि म्हातारे माणसांना सुद्धा दगड मारले व जखमी केले काही जखमी वरती वरणगाव येथील ग्रामीण रुग्णांमध्ये उपचार सुरू आहे
या घटने संदर्भात वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये सर्व आरोपीवर गुन्हे दाखल झालेले आहे मात्र आरोपी फरार असून त्यांचा लवकर शोध घेऊन त्यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करण्यासाठी आज भाई दीपक केदार प्रशासनाला जाब विचारत वरणगाव पोलीस स्टेशन वरती मोर्चा काढला व या घटनेचा जाहीर निषेध केला सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली

No comments:
Post a Comment