महा लोकसंवाद न्यूज
तालुका प्रतिनिधी भुसावळ
वरणगाव ता.भुसावळ येथे शहीद वीर जवान अर्जुन बावस्कर यांच्यावर शासकीय इतमातात अंतिम संस्कार करण्यात आले
याबाबत सविस्तर असे की वरणगाव येथील वीर जवान अर्जुन बावस्कर हे अरुणाचल प्रदेश येथे महार रेजिमेंट या ठिकाणी कार्यरत होते देश सेवा बजावत असताना ते येथे शहीद झाले ते वरणगाव येथे सम्राट नगर मध्ये राहत होते
आज दिनांक २७ मार्च रोजी त्यांची अंतिम यात्रा त्यांच्या राहत्या घरापासून सम्राट नगर येथून वामन नगर मार्गे तिरंगा सर्कल होऊन कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानामध्ये त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात शासकीय ईतमातात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय व शासकीय अधिकारी आणि मंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन व आमदार एकनाथ खडसे उपस्थित होते

No comments:
Post a Comment