प्रांत साहेब, भुसावळ तसेच बिडीओंना दिले राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती द्वारे निवेदन - MHL News

Breaking

Wednesday, 23 July 2025

प्रांत साहेब, भुसावळ तसेच बिडीओंना दिले राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती द्वारे निवेदन

 



महा लोकसंवाद न्यूज(जळगाव)


सविस्तर वृत्त असे कि,पुष्पलता नगर,फुलगांव येथे गट क्र.35/37 वर मागील वर्षी बौद्ध अनुयायांनी वर्षावास कार्यक्रम घेतला होता, बुद्ध जयंतीला सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम त्या जागेवर घेण्यात आले होते ,ग्रंथवाचन,वंदना तसेच सांस्कृतिक कार्यक्रम तिथे अनुयायांमार्फत घेतले जात होते,13 मार्च 2025 रोजी रात्री त्या जागेवर अज्ञात व्यक्तीने बुद्ध मुर्ती बसविली , त्याचप्रमाणे 4/7/2025 रोजी तेथील रहिवाशांनी ग्रामपंचायत कार्यालयात सदरील जागा धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी उपलब्ध करून द्यावी,असा अर्ज सुद्धा केलेला होता, त्याचप्रमाणे 7/7/2025 रोजी गटविकास अधिकारी यांना सुद्धा हि जागा धार्मिक कार्यासाठी आम्हाला देण्यात यावी, असा अर्ज गावकऱ्यांनी दिला होता,



हि जागा बौद्ध अनुयायी बळकावतील या भितीपोटी ग्रामपंचायत कार्यालयाने ती जागा देण्यास नकार दिला, मागील वर्षी वर्षावास कार्यक्रम घेतले त्यावेळी कोणाचाच नकार नव्हता मग आजच्या घडीला नकार कसा,तर मनुवादी बुरसटलेल्या विचारांचा प्रभाव असलेली लोकं दोन गटात वाद निर्माण होईल म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत,गावात इतर धर्मियांच्या कुठल्याही प्रार्थना स्थळाला कुणी विरोध करत नाही, तेथील बौद्ध लोकं स्वतः देवादिकांच्या कार्यक्रमात त्यांना नेहमी हातभार लावत असतात,मग आज बुद्ध मुर्ती या लोकांना का खटकावी,का बुद्धांचे कार्यक्रम खटकावे, बौद्ध लोकांच्याच कार्यक्रमाला विरोध का... म्हणून मुर्ती उचलण्याची बातमी कानावर येताच तेथील महिला अनुयायांनी उपोषण सुरू केले,तसेच राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती, भारत मुक्ती मोर्चा कडे मदत मागितली असता आज दि.23 जुलै 2025, बुधवार रोजी दुपारी 12:00 वाजता प्रांत साहेबांना तसेच बिडीओ साहेबांना भुसावळ येथे निवेदन देण्यात आले ,गावात वाद होऊ नये,दोन गटात तेढ निर्माण होऊ नये,करीता तेथील बौद्ध अनुयायांना बूद्धमुर्ती बसविलेली गट क्र.35/37 जागा वर्षावास तसेच धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी देण्यात यावी, त्यांना विरोध करु नये,असे निवेदन देण्यात आले,आणि तरीही याउपर आपल्या कार्यालयाने तेथील बौद्ध अनुयायांची दखल न घेतल्यास संबंधित शासन -प्रशासन याला जबाबदार राहील व आपल्या विरोधात संघठनेद्वारे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत असतांना दिला.


निवेदन देत असतांना राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती तसेच भारत मुक्ती मोर्चा ची कार्यकर्ते उपस्थित होते,जसे कि,मा.नितिन गाढे,मा.रामराज परदेशी,मा.कुंदन तायडे,मा.राजेंद्र तायडे,मा.रविंद्र गायकवाड,मा.दिपक कांबळे,मा.विजय सपकाळे,मा.अशोक भालेराव .

No comments:

Post a Comment