प्रतिनिधी (नवी मुंबई)
पोलीस स्टेशन म्हटलं की कर्तव्य दक्ष पोलीस ऑफिसर कोण आहे? हि भावना सामान्य माणसाच्या मनात जन्म घेते आणि त्यात मुळातच जर एखाद्या क्लास वन अधिकाऱ्या चा स्वभाव
माया ममता, सारखा गोड असला तर सोन्याहून पिवळे झाल्या सारखं वाटते.
पाच जूनला दिल्या गेलेल्या फिल्म फेस्टिवल चे सर्वे सर्वा दिग्दर्शक मुकेश कनेरीं च्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारा चे मानकरी प्रोडूसर, डायरेक्टर विशाल वाघ, यांचा माया ममता चित्रपट बनवण्या संदर्भातला धडपडीचा प्रवास बघून मानवता भूषण सीनियर इन्स्पेक्टर मंगेश जी शिंदे साहेबांनी दिल खुलास हसत मुखाने सत्कार करून चित्रपट यशस्वी व्हावा या साठी शुभेच्छा व्यक्त केल्या. ह्या वेळेस,साहेब हे खरच कलागुणी लोकांचे आणि धडपड करणाऱ्यांचे कौतुक करणारे व्यक्तिमत्व असून कर्तव्यात कठोर आणि माणुसकीत प्रेमळ हात उंचावणारे आहेत या शब्दात महिला मंडळाच्या दिवा विभागाच्या रणरागिणी, समाज सेविका सौ.सुरेखा तोरणे,ह्यांनी शब्द सुमनांनी साहेबांचा गौरव केला,तर हितचिंतक समाज सेविका
सौ. रंजना घोडेराव आणि
सौ. अश्विनी माने तसेच आदरणीय शिवनाथ गोरे ह्यांनी निर्मात्याचे अभिनंदन केले. साहेब क्लास वन च्या हुद्यावर असताना सुद्धा आपण सगळे एकाच वर्गात आहोत. आणि कोणाचं मन कुणा मार्फत ही दुखणार नाही याची जर काळजी घेतली, तर माया ममता चा उद्देश सफल झाल्या सारखी वागणूक साहेबांच्या हसऱ्या चेहऱ्या तून मला दिसली आणि बरच काही शिकायला मिळालं या शब्दात निर्माता/ दिग्दर्शक /लेखक/गीतकार /आणि उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता विशाल वाघ साहेब यांनी वरिष्ठ पो. नि. नवी मुंबई मानखुर्द,वाहतूक विभाग तसेच कर्तव्या वर असलेल्या सर्व सन्माननिय पोलीस वृंदाचे मनस्वी आभार मानले.
महा लोकसंवाद न्यूज
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
मो.9595755097

No comments:
Post a Comment