प्रकाश सुरवाडे (महा.लोकसंवाद न्यूज जळगाव)
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार जळगाव जिल्ह्यासाठी दिनांक 28 /9/ 2025 रोजी येलो अलर्ट जारी केलेला आहे सदरचा येलो अलर्ट पूर्ण दिवसासाठी मर्यादित आहे
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याद्वारे प्राप्त इशारा कळवण्यात येईल जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे विजेच्या कडकडाट सह व ढगांच्या गडगडाट सह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अजिंठा घाट परिसरातील मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा चाळीसगाव भडगाव एरंडोल जामनेर या तालुक्यातील नदीकाठची गावे प्रभावीत झाली होती त्या अनुषंगाने संबंधित तालुक्यांनी सर्व विभागांना व नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सुचित करण्यात यावे तसेच पशुधन शेतमाल यांचे सुरक्षेबाबत दक्षता घेण्याबाबत नागरिकांना प्रसार माध्यमांतुन कळविण्यात यावे तसेच खबरदारीच्या उपाययोजना आपत्ती पुर्व नियोजन करावे असे आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हा कार्यालय जळगाव यांनी कळविले आहे

No comments:
Post a Comment