महा लोकसंवाद न्यूज
ता. प्रतिनिधी (बोदवड )
आज दिनांक १३ रोजी भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री रामेश्वर लोहार यांनी बोदवड गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले
सदर निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की शिरसाळा तालुका बोदवड येथे झालेल्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामामध्ये तसेच चौदावा वित्त आयोग पंधरावा वित्त आयोग या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे सदर कामे हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे
या सर्व कामांची पूर्ण चौकशी करून संबंधित ठेकेदार व जो कोणी अधिकारी जबाबदार असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री रामेश्वर लोहार यांनी गटविकास अधिकारी बोदवड यांच्याकडे केली आहे सदर कारवाई लवकर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा निवेदनामध्ये देण्यात आलेला आहे

No comments:
Post a Comment