वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी घेतली रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची सदिच्छा भेट. - MHL News

Breaking

Thursday, 13 November 2025

वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी घेतली रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची सदिच्छा भेट.

 


महा.लोकसंवाद न्यूज 

जिल्हा प्रतिनिधी (जळगाव)


इंदु मिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रणेते, बौद्धजन पंचायत समिती सभापती व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांची दिनांक १२ नोहेंबर २५ रोजी आंबेडकर भवन येथे जळगाव जिल्हा पूर्वेचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे त्यांचे सोबत जळगाव पश्चिमचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, माजी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, भुसावळ शहर महासचिव मेजर देवदत्त मकासरे सुध्दा उपस्थित होते.


जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपालिका ,नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या सदिच्छा भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.या भेटीतून नव्या राजकारणाची सुरुवात होईल का अशी जिल्ह्यात चर्चा सुरू झाली असल्याचे समजते.

No comments:

Post a Comment