: संग्रामपूर तालुक्यातील पायथ्याशी असलेले सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील ५० मुली व १६० मुले यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांनी आज सात डिसेंबर रोजी आदिवासी माध्यमिक व कनिष्ठ कला महाविद्यालय टुनकी बु येथे विद्यार्थ्यांचे पोलीस भरतीसराव परीक्षा पोलीस भरती घेण्यात आली. यामध्ये आदिवासी भागातील एकूण २१० मुला-मुलींनी सहभाग नोंदविला यावेळी ठाणेदार यांनी उपस्थित मुला मुलींना मार्गदर्शन केले तसेच होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी
आदिवासी भागातील तरुण तरुणांनी लेखी परीक्षा सोबतच शारीरिक उंच उडी लांब उडी, रनिंग, गोळा फेक इत्यादी बाबी बद्दल मौलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस हे कॉ विनोद शिमरे, नारायण खरात, विनोद वानखडे, ड्रायव्हर इमरान भाई गणेश मोरखडे, परमेश्वर तीतरे, राहुल पवार, लकशीमन बोके, दत्ता घुसे, प्रवेक्षक सतोष दाभाडे सर, नीलेश तायडे सर उपस्थित होते.
पोलीस स्टेशन हद्दीतील नवयुवक व नवयुती जे पोलीस भरती, सैन्य भरती यामध्ये सहभागी होणाऱ्यानी कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास ती तात्काळ सोडवण्यात येईल सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.

No comments:
Post a Comment