महा लोकसंवाद न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/जळगाव
सविस्तर बातमी अशी कि आज दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त
संस्कृती माध्यमिक विद्यालय मेहरून जळगाव येथे स्वतंत्र दिनानिमित्त कार्यक्रमात
विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून प्रभात फेरीत सहभागी होऊन चैतन्याचे वातावरण निर्माण केले. या प्रसंगी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लिनेस क्लबच्या अध्यक्षा मा.सौ.रेश्मा बेहराणी, श्री.किशोर बेहराणी
लँन्ड डेव्हलपर्स,तसेच,जय दुर्गा महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका जयश्रीताई सुनिल महाजन तसेच जय दुर्गा ग्रुप चे सचिव श्री. ललितभाऊ धांडे, कृ.उ.बा.समितीचे सदस्य श्री. ज्ञानेश्वरदादा नाईक, तसेच .श्री.अनिलदादा पाटील.संचालक जय दुर्गा गृप मेहरूण,जळगाव हे उपस्थित होते.
सौ.रेश्मा बेहराणी श्री.किशोर बेहराणी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
अमृत महोत्सव हर घर तिरंगा अंतर्गत विद्यार्थ्यांची कवायत,गीत गायन,भाषणे,देशभक्तीपर गीते,तसेच विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. नंतर विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले
सौ.जयश्रीताई महाजन व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. डिंपल येवले व कार्यक्रमास उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते खाऊ वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक वर्ग तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनीषा जाधव यांनी आभार प्रदर्शन मा.श्रीम.अश्विनी फालक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक वर्ग यांनी सहकार्य केले.

No comments:
Post a Comment