अनियमित वीज पुरवठ्या मुळे आचेगाव सुसरी पिंपळगाव खुर्द येथील शेतकरी त्रस्त - MHL News

Breaking

Friday, 4 September 2026

अनियमित वीज पुरवठ्या मुळे आचेगाव सुसरी पिंपळगाव खुर्द येथील शेतकरी त्रस्त

 


अनियमित वीज पुरवठ्यामुळे कंटाळून ग्रामस्थ शेतकरी करत आहे आंदोलनाची तयारी 


आचेगाव ता.भुसावळ येथे विद्युत वितरण कंपनीकडून नेहमी अनियमित वीज पुरवठा होत असून यामुळे येथील शेतकरी हैराण झालेले आहे 


सविस्तर असे की आचेगाव सुसरी पिंपळगाव खुर्द हे गावे भुसावळ तालुक्यातील असून येथे गोळेगाव ता.बोदवड या सब स्टेशन वरून वीस पुरवठा होत असून शेतीला होणारा वीस पुरवठा हा वेळवर व दिलेल्या वेळेत होत नसून नेहमी अनियमित वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्यायला फार त्रास होत आहे अगोदरच पाऊस येत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेला आहे यातच वीज पुरवठा कंपनीचे अधिकारी कर्मचारी वेळेवर वीस पुरवठा करत नाही शेतकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे 

झिरो लोड शेडिंग च्या नावावर कधीही विद्युत पुरवठा खंडित करत असून शेतकरी फार वैतागले आहे 


वीज वितरण कंपनीने लवकरच वेळेवर वीज पुरवठा देऊन शेतकऱ्यांचा प्रश्न त्वरित सोडवावा नाहीतर येथील शेतकरी आकाश झांबरे आणि इतर शेतकरी मोठे आंदोलन करणार असल्याचे आकाश झांबरे यांनी सांगितले

No comments:

Post a Comment