दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी - MHL News

Breaking

Monday, 7 September 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी

 



जळगाव/ जिल्हा प्रतिनिधी 


सध्या अनेक भागांमध्ये पावसाचे अनियमित प्रमाण, पावसातील खंड आणि पाण्याची टंचाई यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.


या गंभीर परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीकविमा नुकसानभरपाई, पिण्याचे व शेतीचे पाणी, चारा उपलब्ध करून द्यावा. तसेच शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.


शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे कागदोपत्री घोषणा न करता प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचणे आवश्यक आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, हीच अपेक्षा आहे.


रामेश्वर लोहार-

जिल्हाध्यक्ष, जळगाव जिल्हा

भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटना

No comments:

Post a Comment