घरणेशाही वाचविण्यासाठी,लोकशाहीचा बुरखा पांघरणाऱ्यापासुन सावध व्हा !वंचिताच्या विकासासाठी वंचित सोबत या… इंजि. संजय पंडित ब्राम्हणे - MHL News

Breaking

Tuesday, 2 April 2024

घरणेशाही वाचविण्यासाठी,लोकशाहीचा बुरखा पांघरणाऱ्यापासुन सावध व्हा !वंचिताच्या विकासासाठी वंचित सोबत या… इंजि. संजय पंडित ब्राम्हणे

 




महा.लोकसंवाद न्यूज

प्रतिनिधी: भुसावळ


वंचित बहुजन आघाडी #रावेर_लोकसभा_उमेदवार_संजय_पंडित_ब्राह्मणे यांच्या लोकभेटी व गट गट कार्यकर्ता संवाद बैठक भुसावळ येथे दि २/४/२०२४ रोजी संपन्न झाला त्यावेळी भुसावळ शहरातील तसेच तालुक्यातील २०० ते २५० महिला व युवकांचा सहभाग होता. 


याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील यांनी वंचितांचे राजकारण हा केवळ सत्तेचा भाग नसून लोकशाही मार्गाने दिलेला अधिकार व हक्क कायम ठेवण्यासाठी चा सामजिक परिवर्तनाचा राजकिय लढा आहे. यात युवा व महिला वर्गाने अधिक ताकदीने सहभागी व्हावे असे प्रतिपादन केले.तसेच गट गण बुथ बांधणी विषयी चर्चा केली.

युवाध्यक्ष बाळा पवार यांनी बाळासाहेब आंबेडकर यांचे राजकीय भुमिका हि कशी सर्वसमावेशक आहे यावर भर दिला.

महिला आघाडी अध्यक्ष वंदना सोनावणे यांनी महिलांचा राजकीय सहभाग वाढविण्यासाठी सक्रिय व्हावे असे आवाहन केले. 

जिल्हा महासचिव अँड. योगेश तायडे यांनी तालुका गट गण बुथ बांधणी विषयी चर्चा केली.

 

भुसावळ तालुका निरिक्षक तसेच जिल्हा संघटक बबन कांबळे, तालुकाध्यक्ष प्रमोद बाविस्कर, तालुका सचिव गणेश इंगळे,जिल्हा संघटक ईश्वर लहासे, करन तायडे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाध्यक्षा शमीभाताई पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार, महिला जिल्हाध्यक्ष, वंदनाताई सोनवणे, अँड योगेश तायडे जिल्हा महासचिव वंदनाताई आराक जिल्हा महासचिव, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष माहिला आघाडी मीराताई वानखेडे,भुसावळ तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ बावस्कर, जिल्हा संघटक तथा भुसावळ ता . निरीक्षक बंबनभाऊ, कांबळे , जिल्हा युवा आघाडीचे सचिव मोहन भाऊ पाटील,तालुका महासचिव गणेश भाऊ इंगळे, तालुका उपाध्यक्ष निलेश जाधव, सलीम शेख उपाध्यक्ष,,संदीप सुरवाडे उपाध्यक्ष, संतोष सुरवाडे उपाध्यक्ष, सचिव,योगेश सावळे सचिव, नितीन इंगळे सचिव, मनोज ठोकळ सचिव, बंटी सोनकांबळे सचिव,जितेंद्र सुरवाडे सचिव,कुणाल सुरळकर संघटक, सुभाष शिंदे सहसंघटक, रतन इंगळे कोषाध्यक्ष, ऍड प्रमोद तायडे सल्लागार,ऍड मनोहर सपकाळे सल्लागार, सागर सोनवणे सदस्य, युनुस शहा सदस्य, भुसावळ शहर अध्यक्ष गणेश भाऊ जाधव, शहर महासचिव देवदत्त मकासरे, सिव्हिल इंजि. अनिल इंगळे,सचिन वानखेडे, प्रीती तायडे,दीपक वाघ व तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार इंजिनिअर संजय पंडित ब्राह्मणे हे स्वतः या संवाद मेळाव्यास उपस्थित झाल्याने उपस्थित लोकांमध्ये मोठा उत्साह बघावयास मिळाला.


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे

मो.९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment