हिंदी मराठी पत्रकार संघाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
महा.लोकसंवाद न्यूज
मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे
आज दिनांक ५/४/२०२५ ऱोजी जळगाव जिल्हा अधिकारी यांना हिंदी मराठी पत्रकार संघटनेतर्फे दिले निवेदन.
सविस्तर माहिती अशी की. बोदवड येथील भारत चिकन फिश हॉटेल येथे काही दिवसापूर्वी पत्रकार नितीन सुरवाडे हे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले असता त्यांनी जेवनासाठी बिर्याणी घेतले ते बिर्याणी एकदम शिळे व दुर्गंधीयुक्त लागल्यामुळे त्यांनी तेथील हॉटेलचे वेटर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की हे चिकन बिर्याणी दोन-तीन दिवसांपूर्वीचे आहे तर नितीन सुरवाडे त्यांना म्हणाले की तुम्ही लोकांना असे निकृष्ट दर्जाचे जेवण देता का व त्या संदर्भात नितीन सुरवाडे यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी जळगाव यांच्याकडे हॉटेलची लेखी तक्रार केली होती त्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जळगाव येथून अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी दिनांक ३ बुधवार रोजी बोदवड येथे आले व तक्रारदार नितीन सुरवाडे पत्रकार व त्यांच्यासोबत त्यांचे मित्र पत्रकार युवराज तायडे हे सुद्धा तेथे गेले असता त्या हॉटेल मालकाने त्याच्या ओळखीचे नगरसेवक यांना बोलावून घेतले व त्या नगरसेवकाने नितीन सुरवाडे व हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा संघटक युवराज तायडे आणि तेथील अधिकारी यांच्याशी हुज्जत बाजी व अरेरावीची भाषा केली व तेथे लोकांचा जमाव जमवून त्यांच्यावर दडपण निर्माण केले तरीसुद्धा अधिकारी यांनी पोलीस कर्मचारी बोलावून त्या हॉटेलला सील ठोकले .
सदर पत्रकारांची हुज्जत बाजी करणाऱ्या व आणि अरेरावीची भाषा करणाऱ्या नगरसेवकावर कारवाई व्हावी अशी मागणी हिंदी मराठी पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आली सदर निवेदनावर
१) संजय तायडे.
जिल्हाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना
२) प्रकाश सुरवाडे जिल्हा उपाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना
३) युवराज तायडे जिल्हा संघटक हिंदी मराठी पत्रकार संघटना
४) राजू शेजोळे हिंदी मराठी पत्रकार संघटना बोदवड तालुका अध्यक्ष
५) रामेश्वर लोहार महा लोकसंवाद न्यूज उपसंपादक जळगाव
६). हेमराज सोनवणे पत्रकार जळगाव
७) प्रवीण सपकाळे पत्रकार जळगाव
८) सचिन गोसावी पत्रकार जळगाव
९) नितीन सुरवाडे पत्रकार बोदवड
१०) प्रमोद बावस्कर पत्रकार भुसावळ
११) योगेश चौधरी पत्रकार जळगाव
१२) अमोल कोल्हे पत्रकार जळगाव इत्यादींच्या सह्या आहे
जाहिरात व बातम्या साठी संपर्क
मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे
मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment