प्रतिनिधी (महा.लोकसंवाद न्यूज)
चाळीसगाव (जळगाव)
दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी संभाजीनगर जिल्ह्यातील, कन्नड तालुक्यातील नागद आणि सायगव्हाण या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गावात तसेच चाळीसगांव तालुक्यातील जामडी या गावात राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल यांनी सम्पर्क दौरा केला. शहर प्रचारक दीपक बागुल , राहुल बेंडाळे , बाबा चव्हाण आणि राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल यांचे चिरंजीव युवा उद्योजक अवधेश बागुल यांनी दौऱ्यात सहभाग घेतला होता.
या दौऱ्यात 3 गावात बैठका घेण्यात आल्या आणि असंख्य तरुणांशी चर्चा करण्यात आली.
नागद येथील दलाचे कार्यकर्ते आयु.सिद्धार्थ सोनवणे , सायगव्हाण येथील आयु. भुषण अहिरे , जामडी येथील रवी अहिरे यांनी या दौऱ्यासाठी विशेष सहकार्य केले.
या दौऱ्यात मुस्लिम , भिल्ल , मोची , चर्मकार , बौद्ध , परदेशी अशा वेगवेगळ्या समाजाच्या उपस्थित नागरिकांना समता सैनिक दलाची माहिती आणि महत्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.*
त्याचप्रमाणे 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या चाळीसगांव येथील निर्धार मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
उपस्थित लोकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून , सर्वांनी समता सैनिक दलात सामील होण्याची तयारी दर्शविली.
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
मो. 9595755097

No comments:
Post a Comment