महा.लोकसंवाद न्यूज
जिल्हा प्रतिनिधी (जळगाव)
सविस्तर बातमी असे की.
आज दिनांक १५/८/२०२४
रोजी संस्कृती महाविद्यालय जळगाव येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी येथे उपस्थित
विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून प्रभात फेरीत सहभागी होऊन चैतन्याचे वातावरण निर्माण केले. परिसरात शंभर फुटी तिरंगा घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली.या प्रसंगी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून के.एन.लँड डेव्हलपर्स चे संचालक मा.श्री.किशोरजी बेहेरानी,लायन्स क्लबच्या सेक्रेटरी मा.सौ.रेशमा बेहेरानी,जय दुर्गा महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका मा.सौ.जयश्रीताई सुनिल महाजन तसेच जय दुर्गा ग्रुप चे सचिव श्री. ललितभाऊ धांडे, कृ.उ.बा.समितीचे सदस्य श्री. ज्ञानेश्वरदादा नाईक, श्री. अनिलदादा पाटील हे उपस्थित होते. मा.श्री.किशोरजी बेहेरानी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
मा.सौ..जयश्रीताई महाजन व आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. डिंपल येवले व आमच्या कार्यक्रमास उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते चाँकलेट वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक वर्ग तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनीषा जाधव यांनी आभार प्रदर्शन मा.श्रीम.ज्योती सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक वर्ग यांनी सहकार्य केले.
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment