महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी (बोदवड )
आज दि.१/९/२०२४ रविवार रोजी आरपीआय आठवले गटाचा लोकसंवाद मेळावा शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झाला
सविस्तर माहिती अशी की बोदवड येथील शासकीय रेस्ट हाऊस मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा लोकसंवाद मेळावा राज्य उपाध्यक्ष रमेशजी मकासरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला यावेळी सुदाम सोनवणे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष लक्ष्मण जाधव खानदेश अध्यक्ष भगवान भाऊ सोनवणे जिल्हा अध्यक्ष जळगाव यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि जिल्हाध्यक्ष भगवान भाऊ सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले आता विधानसभेच्या निवडणुका असून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी तयार राहायला हवे आणि प्रत्येक गावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा निर्माण करावी कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची गरज वाटली तर मला संपर्क साधावा असे भगवान भाई सोनवणे यांनी बोलताना सांगितले
यावेळी कार्यक्रमांमध्ये नवीन कार्यकर्त्यांची नियुक्ती रमेश जी मकासरे व भगवान भाऊ सोनवणे यांनी केली संजय तायडे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी सदानंद वाघ यांची तालुका अध्यक्ष पदी व विकी गुरचळ यांची तालुका युवक अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला बोदवड तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते व पत्रकार मंडळी उपस्थित होती
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भाऊ तायडे यांनी केले
सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
मो. 9595755097

No comments:
Post a Comment