एक तोळयाची सोन्याची चैन केली परत
(महा.लोकसंवाद न्यूज)
प्रतिनिधी चाळीसगाव (तालुका)
दिनांक ३१/७/२०२४ येथील
आनंदीबाई बंकट मुलांचे हायस्कुलमध्ये इयत्ता पाचवीच्या दोन विद्यार्थ्यांना खेळतांना ग्राऊंडवर सोन्याची हरवलेली एक तोळ्याची चेन शाळेचे कलाशिक्षक डी, के, चव्हाण यांचेकडे आणून दिली.
शाळेत शुक्रवार दि, ३० ऑगस्ट रोजी शाळेचे जेष्ठ शिक्षक हि, रा, शेलार यांच्या सेवानिवृत्त्तीचा कार्यक्रम सायंकाळी संपन्न झाला. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, हि, रा, शेलार सर यांचे परिवारातील सदस्य, आप्तेष्ट, नातेवाईक मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होता. याच कार्यक्रम दरम्यान हि, रा शेलार यांच्या परिवारातील मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील रहिवासी असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन साखळी गर्दीमध्ये हरवली, पाऊस असूनही खूप शोधाशोध घेतली असता मिळून आली नाही.
दुसऱ्या दिवशी हि, रा, शेलार सर यांचा सेवानिवृत्त्तीचा सत्कार विद्यार्थ्यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी शाळेतील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी चि,अफराज राजू शेख व गणेश रवींद्र चव्हाण या विद्यार्थ्यांना ग्राऊंडवर खेळतांना चेन सापडली ती त्यांनी शाळेचे कलाशिक्षक डी, के, चव्हाण यांच्या ताब्यात दिली. सदरील चेन ही नंतर हि, रा, शेलार सर यांच्या ताब्यात देण्यात आली. विद्यार्थ्यांना रोख रक्कम हि, रा, शेलार यांनी बक्षीस म्हणून दिले.
शाळेत राबवण्यात येते प्रामाणिक विद्यार्थी संकल्पना शाळेचे कलाशिक्षक चेतन कुऱ्हाडे व डी, के, चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही कल्पना उदयास आली व मागील एक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या उपक्रमात आठवडा भरात ज्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व इतर काही वस्तू सापडतात ते शाळेत संबंधित शिक्षकांकडे आपली नावे देऊन सापडलेल्या वस्तू जमा करतात.अशा विद्यार्थ्यांचा दर शनिवारी परिपाठ व शालेय उपक्रमांतर्गत प्रामाणिक विद्यार्थी म्हणून व्यासपीठावर भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात येतो, याचापरिणाम म्हणून शाळेत कुठलीही शालेय वस्तू, पैसे चोरीला जात नाही व विद्यार्थ्यांमध्ये प्रमाणिकपणाची भावना रुजवली जात आहे हे ही तितकेच महत्वाचे. याचीच फलश्रुती म्हणून गहाळ झालेली १० ग्रॅम सोन्याची चेन परत मिळाली. शाळेचे चेअरमन मा. श्री. योगेशभाऊ अग्रवाल यांनी दोघेही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment