भुलाबाई महोत्सवात जि.प. उच्च प्राथमिक शाळा टहाकळी जिल्हा स्तरीय स्पर्धेत द्वितीय.. - MHL News

Breaking

Monday, 30 September 2024

भुलाबाई महोत्सवात जि.प. उच्च प्राथमिक शाळा टहाकळी जिल्हा स्तरीय स्पर्धेत द्वितीय..

 


महा.लोकसंवाद न्यूज 

जिल्हा प्रतिनिधी: जळगाव 


जळगाव : केशव स्मृति प्रतिष्ठान  यांच्या विद्यमाने भुलाबाई महोत्सव 2024चे आयोजन 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास 

छत्रपती संभाजीराजे नाट्य सभागृह जळगाव येथे करण्यात आले होते. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील  तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आलेल्या अनेक शाळांनी सहभाग नोंदविला. यास्पर्धेत  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टहाकळी उत्तम सादरीकरण  करित (मोठा गटात)द्वितीय स्थान पटकाविले आहे. 


माननीय. खासदार स्मिताताई वाघ, माननीय सौ. रजनी सावकारे मॅडम आणि इतर सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते जि.प उच्चं प्राथमिक शाळा 

टहाकळी येथील शिक्षक वृद यांनी पारितोषिक स्वीकारले


आजच्या आधुनिक काळात स्थानिक लोकपरंपरांची आणि संस्कृतीची ओळख करून देऊन महिलांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी प्रतिष्ठित भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. लहान गट,मोठा व  खुला अशा तीन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मोठा गटामध्ये जि.प.उच्च प्राथमिक शाळा टहाकळी च्या मुलींनी पारंपारिकरित्या नृत्य करून उपस्थितीतांना मंत्रमुग्ध करित जिल्ह्यातून द्वितीय स्थान पटकाविले आहे. या शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक घनश्याम सावरकर यांनी गित रचले तर या गितावर  शिक्षिका मिना दुपारे यांनी नृत्य दिग्दर्शित केले. तबला व हार्मोनियम वर विद्यार्थ्यांनी साथ  दिली आहे हे विशेष. टहाकळी शाळेने प्राप्त केलेल्या यशाबद्दल ग्रामस्थानी कौतुकाचा वर्षाव केला आहे. या सुयशासाठी शाळेतील शिक्षिका ज्योती बेलसरे व शिक्षक पंकज डोंगरे, राकेश पाटील सर यांनी परिश्रम घेतले.


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)

मो.9595755097

No comments:

Post a Comment