महा.लोकसंवाद न्यूज
तालुका प्रतिनिधी भुसावळ
सविस्तर वृत्त असे की आज दि. 30 सप्टेंबर रोजी संविधान आर्मी व विविध संघटनेच्या वतीने वरणगाव येथे जल आक्रोश व रस्ते आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
सविस्तर असे की सर्वप्रथम तिरंगा चौक येथे ३ वाजता मोर्चाला सुरुवात झाली यावेळी संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाई सोनवणे व त्यांचे कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला यावेळी
मोर्चा बस स्टँड पासून रेल्वे स्टेशन पर्यंत काढण्यात आला तिथे रेल्वे स्टेशन मास्टर यांना निवेदन दिले आणि आपल्या मागण्या स्टेशन मास्तर यांना सांगितल्या मागण्या अशा की मुंबई येथील दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे लवकर आपल्या मागण्या मंजूर न झाल्यास काही दिवसांमध्ये एक मोठं लाखोच्या संख्येने दादर रेल्वे स्टेशन येथे आंदोलन करण्यात येईल असे सांगितले तसेच वरणगाव येथे होणारा पाणीपुरवठा हा दररोज करण्यात यावा अशा विविध मागण्यांसह मोर्चा संपन्न झाला यावेळी वरणगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव साहेब सह मोठा पोलीस बंदोबस्ता सह रेल्वेचे जीआरपीएफ हजर होते
यावेळी मोर्चामध्ये जगन भाई सोनवणे पुष्पाताई जगन सोनवणे राकेश भाई बगन हरीश भाई सुरवाडे अनिल सुरवाडे व असंख्य कार्यकर्ते हजर होते
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे
मो.9595755097

No comments:
Post a Comment