महा.लोकसंवाद न्यूज
तालुका प्रतिनिधी (बोदवड)
सविस्तर बातमी अशी की
गणराया च्या आगमनाची जय्यत तयारी चालू असताना बोदवड तालुका उ.बा.ठा गटाचे तालुका प्रमुख गजानन भाऊं खोडके ह्यांनी 'आलाय श्री गणेशा, व्हीडिओ चे बॅनर बोदवड शहरात झळकवले असून गणेश भक्ता मध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा विडिओ निर्माता शैलेश पाटील आणि लेखक/ गीतकार /डायरेक्टर वाघ साहेब ह्यांच्या संकल्पनेतून ऍक्टर विलास राजपूत आणि अभिनेत्री सोनाली बांदेकर मुंबई ह्यांनी साकारला आहे.सुप्रसिद्ध संगीतकार अशोक दादा वायंगणकर ह्यांचे अप्रतिम संगीत असून सिने गायिका संचिता मोरजकर आणि प्रसिद्ध गायक मंगेश शिर्के ह्यांच्या मधुर आवाजात स्टुडिओ फिनिक्स ला रेकॉर्डिंग केली असून मन्थन इंटरेटेनमेंट चे सुरेश जी पितळे सर ह्यांची कोरीओग्राफी, बॉलिवूड चे
(डी. ओ. पि) सरफराज अली हसन खान आणि कॅमेरा असी.
अरविंद जी प्रसाद, फोकस पुलर शैलेश जी पाटील ह्या सर्वांच्या प्रयत्नाने गणराया चे स्वागत गीत तयार झाले आहे.आणि T. Series चे विश्वसनिय प्रज्योत जी माने साहेब ह्यांनी प्रसारित केला आहे. तसेच दीपक सोनावणे, आम्रपाली सोनावणे, रुपेश जाधव आणि बऱ्याच कलावंतां चा समावेश असून
बोदवड (उ.बा.ठा) तालुका प्रमुख गजू भाऊ खोडके, शहर प्रमुख विशाल भाऊ भोई, भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रामेश्वर लोहार साहेब, राष्ट्रवादी (शरद पवार )चे युवा मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मुन्ना भाऊ बोन्डे ह्या सर्वांनी गणरायांच्या ह्या व्हीडिओ गाण्याला मनस्वी शुभेच्छा दिल्या
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
मो.9595755097

No comments:
Post a Comment