महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी: मुक्ताईनगर
आज दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी
भारत सरकार मान्यता प्राप्त भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटना संस्थापक विठ्ठल भाऊ व्हनमारे यांच्या आदेशाने, सामान्य लोकांच्या विकासा साठी कृतिशील विचारांची देवाण घेवाण व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आदरणीय गुलाब मामू पटेल, यांच्या आदर्शमय चौकटीतून जिल्हाध्यक्ष आदरणीय रामेश्वर लोहार साहेब यांच्या प्रयत्नातून हा सोहळा आज बोदवड येथे धुमधडाक्यात संपन्न झाला.
या वेळेस मुक्ताईनगर कुऱ्हा विभागाचे क्रियाशील तालुकाध्यक्ष बाबुरावजी बोंडे यांनी जिल्हा प्रवक्ता संतोष जी चिकटे महाराज यांच्या अनुमतीने आणि क्रियाशील कार्यकर्ता श्री साहेबराव जी बोन्डे ह्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष गुलाब मामु व जिल्हाध्यक्ष रामेश्वर लोहार चे स्वागत केले.
विधानसभा तोंडावर असल्यामुळे सामान्य लोकांची लूट मार होऊ नये. माना सन्मानाची वागणूक देणाऱ्या उमेदवारा सोबतच आपण घटक पक्ष या नात्याने आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहोत
तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणार आहोत. असे कार्याध्यक्ष गुलाब मामु यांनी ठणकावून सांगितले. तर आदेशांचे तंतोतंत पालन होईल या शब्दात जिल्हाध्यक्षांनी बोदवड कुऱ्हा परिसरातील जनते समोर जाहीर केले. आपल्या संघटनेच्या माध्यमातूनच आम्ही सामान्यांचे स्वप्न सजवण्यास कटिबद्ध आहोत असे पंचक्रोशीतील (ह.भ.प.) कीर्तनकार आणि या संघटनेचे जिल्हा प्रवक्ता संतोष जी चिकटे महाराज यांनी परखड शब्दात मत मांडले. ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी काही लोकांना पद वाटप करण्यात आले त्यात प्रामुख्याने भागवत कांडेलकर तालुकाध्यक्ष, पांडुरंग चिकटे छाया चित्रकार, कैलास शिराळे उप तालुकाप्रमुख आणि फेर निवड मध्ये संतोष महाराज चिकटे यांची जिल्हा प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सोबतच कैलास शिराळे भरत कांडेलकर भागवत कांडेलकर दलपत नावकर मारुती सोनवणे मनोहर सोनवणे दयाराम कांडेलकर गौतम सावळे आणि योगेश इंगळे यांना गौरव करून संघटनेत प्रवेश देण्यात आला. मुंबईहून या सर्वांची धावपळ बघून निर्माता निर्देशक विशाल वाघ साहेब यांनी शब्द सुमनांनी कौतुक जाहीर केले. आदरणीय बाळू बोंडे साहेबांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो ९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment