लाडकी बहिणी योजनेमुळे संजय गांधी निराधार विधवा परितक्ता श्रावणबाळ इंदिरा गांधी लाभार्थ्यांसोबत शासनाचा अन्याय, - MHL News

Breaking

Tuesday, 8 October 2024

लाडकी बहिणी योजनेमुळे संजय गांधी निराधार विधवा परितक्ता श्रावणबाळ इंदिरा गांधी लाभार्थ्यांसोबत शासनाचा अन्याय,

 



 विजय सावळे यांचा गंभीर आरोप 


महा.लोकसंवाद न्यूज 

प्रतिनिधी: भुसावळ 


 याबाबत सविस्तर वृत्त असे की जेव्हा पासून शासनाने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जी काही आर्थिक मदत दरमहा पंधराशे रुपये सुरू केली आहे, हे चांगले असून परंतु शासनाने यामुळे ह्याआधी संजय गांधी निराधार, विधवा अपंग श्रावण बाळ इंदिरा गां योजनेचे जे लाभार्थी होते यांना आधी अनुदान येत होते त्यांचे अनुदान अचानक थांबवून त्यांचा निधी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येत आहे तसेच गेल्या दोन वर्षापासून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत बीपीएल मयत धारकाच्या पत्नीला वीस हजार रुपये अनुदान दिले जायचे हे अनुदान देखील गेल्या दीड ते दोन वर्षापासून थांबलेले आहे यामुळे सर्वसामान्य विधवा महिलांना उपासमारीची वेळ आली असून हा त्रास दूर करावा यासाठी जागृत नागरिक विचार मंचचे अध्यक्ष विजय सावळे, रवींद्र गायकवाड, शांताराम नरवाडे, भोलानाथ गौर, कडू रामकृष्ण सोनवणे, व गरजू महिला यांच्यासोबत, दिनांक 4/ 10/ 2024 ला भुसावळ चे तहसीलदार हेमंत गुरव यांना निवेदन देऊन व्यथा मांडण्यात आली


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे 

मो.9595755097

No comments:

Post a Comment