महा.लोकसंवाद न्यूज
मुख्य संपादक प्रकाश सुरवाडे
बांगलादेशात हिंदू धर्मियांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रीय स्वयं संघाचे माननीय तालुका संघचालक श्री हरी ओम जी शालीग्रामजी जैस्वाल यांच्या नेतृत्वात आज गुरुवार रोजी एक दिवसीय लक्षणीय उपोषण तहसील कार्यालया समोर बोदवड येथे करण्यात आले.
या उपोषना आधी शिवद्वार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेचे पुजन करून शिवद्वार ते तहसिल कार्यालय बोदवड येथील उपोषण स्तळापर्यंत पर्यन्त निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर उपोषणाचे पंचक्रोशीतील विविध सामाजिक संघटनांकडून,व्यवसायिक संघटनांकडून, धार्मिक संघटनांकडून समर्थन करण्यात आले.
बांगलादेशा व भारताच्या सीमेपलीकडिल हिंदू धर्मिय बांधवांवर जो अत्याचार होत आहे, हिंदू मंदिर उद्वस्त केले जात आहे. हिंदू स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. थोडक्यात हिंदू धर्म या राष्ट्रांमधुन संपविण्यासाठी षड्यंत्र सुरू आहे मात्र तेथील सरकार हे सर्व अत्याचार थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करतांना दिसतात नाही किंबहुना या सर्व हिंदूंच्या हत्याकांडात पांठीबाच या सरकारकडून सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. तरी भारत मातेच्या या देवभूमि तील सकल हिंदू समाज या हिंदू नरसंहाराप्रती संवेदनशील आहे व या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणातुन या संवेदना व्यक्त करण्यासाठी
माननीय तालुका संघचालक यांच्या हाकेले हाक देत हिंदू समाजातील १४ बांधवांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून साथ दिली व सकल हिंदू समाजाने उपोषण स्तळाला भेट देऊन उपोषणाला पांठीबा दर्शविला.
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.9595755097

No comments:
Post a Comment