वरणगाव येथील अवैध्य वृक्षतोड प्रकरणी आरोपीवर दंडात्मक कारवाई व्हावी. साठी सामाजिक कार्यकर्ते राजू शेजोळे यांचे वरणगाव नगरपरिषद प्रशासनाला निवेदन - MHL News

Breaking

Thursday, 12 December 2024

वरणगाव येथील अवैध्य वृक्षतोड प्रकरणी आरोपीवर दंडात्मक कारवाई व्हावी. साठी सामाजिक कार्यकर्ते राजू शेजोळे यांचे वरणगाव नगरपरिषद प्रशासनाला निवेदन

 


वरणगाव तालुका भुसावळ येथील मकरंद नगर मध्ये अवैध्य आंबा बदाम शिसम या झाडांची सरास कत्तल होत असून याकडे वन विभाग मुक्ताईनगर आणि वरणगाव येथील नगरपरिषद यांचे पूर्ण दुर्लक्ष होत असून येथे प्रशासनाला न घाबरता बिनधास्तपणे दिवसाढवळ्या झाडांची कत्तल होत असून शासन या गोष्टीकडे पूर्ण काना डोळा करत असून यामुळे आरोपी बिनधास्तपणे झाडांची कत्तल करतात. 

एकीकडे शासन म्हणते झाडे लावा झाडे जगवा आणि दुसरीकडे शासन यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते या झाडांच्या संरक्षणासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू शेजोळे धावुन आले असुन त्यांनी वरणगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले असून सदर आरोपीवर कठोरपणे दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे


महा.लोकसंवाद न्यूज 

मुख्य संपादक प्रकाश सुरवाडे 

मो.9595755097

No comments:

Post a Comment