महा.लोकसंवाद न्यूज
मुख्य संपादक प्रकाश सुरवाडे
आज दिनांक १८ डिसेंबर रोजी बोदवड येथे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबनाप्रकरणी व सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या मृत्यूप्रकरणी या मोर्चाचे आयोजन भीमसैनिक व सर्व समाज बांधव यांनी केले होते सर्व गट तट एकत्र येऊन हा मोर्चा काढण्यात आला.
सदर मोर्चा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणांनी परिसर पूर्ण दणाणून गेला मोर्चा मधील प्रमुख मागण्या अशा होत्या की.
ज्या समाजकंटकाने परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीचे विटंबन केले त्याला कठोर शिक्षा व्हावी व सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा मृत्यूप्रकरणी जे पोलीस कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी परभणी येथे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पकडलेल्या भीम सैनिकावर दाखल झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे या मागण्यांचे निवेदन बोदवड तहसीलदार यांना देण्यात आले
सदर निवेदनावर आमोल तायडे सुरेश तायडे सुपडा निकम महासेन सुरडकर सनी तायडे सुभाष इंगळे आबा पाटील यांच्या सह्या आहे तसेच मोर्चामध्ये सहभागी संजय तायडे उपेंद्र इंगळे सह असंख्य कार्यकर्ते तसेच मोर्चा मध्ये मोठ्या प्रमाणात तालुक्यातील व परिसरातील भीमसैनिक व महिला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते सदर मोर्चा शांततेत पार पडला
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.9595755097

No comments:
Post a Comment