वरणगाव तालुका भुसावळ येथे प्रशिक सामाजिक मित्र मंडळ व भीमसैनिकांतर्फे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या कोनसीले च्या विटंबना प्रकरणी वरणगाव येथे मोर्चा काढण्यात आला.
सविस्तर असे की परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या कोणसिले च्या झालेल्या विटंबना प्रकरणी व भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी वरणगाव येथे प्रसिक सामाजिक मित्र मंडळ व सर्व समाज बांधव भीम सैनिक यांच्याकडून रेल्वे स्टेशन पासून ते पोलीस स्टेशन पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला
यावेळी कामगार नेते मिलिंद मेढे यांनी आपले प्रतिक्रिया देतांना सांगितले परभणी येथील घटना अतिशय दुःखदायक असून जातीय वाद्यांकडून असे संविधानाची तोडफोड व अपमान सतत होत असतो ह्या घटना त्वरित थांबल्या पाहिजे आणि अशा समाजकंटक लोकांना कडक शासन व्हावे व अशा या घटना त्वरित थांबल्या पाहिजे नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही शासनाने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अशे यावेळी मिलिंद मेढे यांनी म्हटले
तथा या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले व येथील वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांना निवेदन देण्यात आले तर
निवेदन देताना मिलिंद मेढे कामगार नेते अनिल सुरवाडे युवराज तायडे राजु शेजोळे नितीन सुरवाडे पत्रकार आणि प्रशिक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व भीमसैनिक मोठ्या प्रमाणात हजर होते

No comments:
Post a Comment