येवती रेवती रोडवर मोठा अपघात एक ठार एक जखमी - MHL News

Breaking

Sunday, 29 December 2024

येवती रेवती रोडवर मोठा अपघात एक ठार एक जखमी

 


बोदवड तालुका प्रतिनिधी 

बोदवड तालुक्यातील येवती रेवती रोडवर एका दुचाकी स्वाराला ढंपरणे उडवले त्या अपघातात एक तरुण ठार आणि एक तरुण जखमी झाला 


याबाबत माहिती अशी की दि.28/12/2024 रोजी वेळ 1.30 वाजता येवती शेलवड रोडवर दोन तरुण मोटर सायकलने क्रमांक MH19AB9312 ईने जात असताना समोरून येणारे ट्रक डंपर क्रमांक MH19CY6428 याने मोटर सायकल ला जबरदस्त धडक दिल्यामुळे मोटरसायकल वरील तरुण नाव विकास सुभाष सावळे वय 22 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण नाव दीपक शेजोळे हा गंभीर जखमी झाला हे दोन्ही तरूण रा.रेवती येथील होते सदर डंपर मालक नाव रामचंद्र काशिनाथ मस्के या शेलवड व डंपर चालक विकास प्रकाश बावस्कर रा . मुक्तळ ता. बोदवड येथील आहे सदरचालकाकडे गाडी चालवण्याचा परवाना व इन्शुरन्स नसताना सुद्धा बे जवाबदारपणे गाडी चालवल्यामुळे बोदवड पोलीस स्टेशनला धर्मा सूर्यभान शेजोळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनेचा पुढील तपास बोदवड पोलीस करीत आहे

No comments:

Post a Comment