*चाळीसगांव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.*
परभणी येथे संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या देशद्रोही हिंवर कारवाई करणे.
तसेच या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या बौद्ध समाजावर केला जाणारा पोलिसी अत्याचार थांबविणे बाबत दिनांक 13 रोजी चाळीसगांव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
दिनांक 10 डिसेंबर रोजी परभणी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ असलेली संविधानाची प्रतिकृती फोडण्यात आली.तिची विटंबना करण्यात आली.या घटनेमुळे समस्त लोकशाहीवादी , संविधान प्रेमी तसेच आंबेडकरवादी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
हे कृत्य करणाऱ्या देशद्रोही समाजकंटकांवर त्वरित कठोर कारवाई झाली पाहिजे .
तसेच याच पार्श्वभूमीवर परभणी येथे आंबेडकरी समाजाने सामुहिकरीत्या निषेध नोंदविला आणि आंदोलन केले असता त्यामुळे शांतता भंग झाल्याचा ठपका ठेवून परभणी येथील आंबेडकरी समाजाच्या , बौद्ध समाजाच्या लोकांवर पोलिसांनी कठोर कारवाई चालू केली आहे.बौद्धांना घरात घुसून पोलीस मारहाण करीत आहेत.निरपराध लोकांना अटक केली जात आहे.वेगवेगळी गंभीर कलम लावून सुशिक्षित तरुणांना आरोपी केले जात आहे.ही हुकूमशाही त्वरित थांबविण्यात यावी. व बौद्ध समाजावर चालविला जाणारा अन्याय बंद करावा अन्यथा या अत्याचार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
शासनाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा या निवेदनात करण्यात आला आहे.
या प्रसंगी जिल्हा संघटक भाईदास गोलाईत, तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव , तालुका संघटक मनोज जाधव , शहर अध्यक्ष विशाल पगारे , तालुका प्रचारक अवधेश बागुल तसेच प्रमुख कार्यकर्ते अजय सोनवणे , राजू अहिरे ,रवींद्र जाधव , सीताराम जाधव , समाधान कोळी ,गणेश पवार ,मुकेश भालेराव ,कौस्तुभ मोरे ,राजाराम मोरे ,सागर निकम ,अरविंद अहिरे ,अमोल पगारे , बाळासाहेब मोरे आदी उपस्थित होते.त्याच प्रमाणे रयत सेनेचे अध्यक्ष मा.गणेश भाऊ पवार यांनी देखील सहभाग नोंदविला.
या प्रसंगी समता सैनिक दलातर्फे समाज बांधवांनी ,आंबेडकर प्रेमींनी शांतता पाळावी व कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल असे कृत्य करू नये.असे आवाहन करण्यात आले.

No comments:
Post a Comment