महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी बोदवड
परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृती चा झालेल्या विटंबना प्रकरणी बोदवड तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनतेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून ते तहसील कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच परभणी प्रकरणातील सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या भीमसैनिक यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या मृत्यू प्रकरणी दोशींवर कडक कारवाई
करून दोषींना कडक शासन व्हावे या मोर्चाच्या प्रमुख मागण्यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे.
अशा प्रकारचे निवेदन आज दि.16 सोमवार रोजी येथील कार्यकर्त्यांनी बोदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप भोळे यांना देण्यात आले
सदर निवेदनावर संजय तायडे जिल्हा उपाध्यक्ष आर पी आय सदानंद वाघ तालुका अध्यक्ष आरपीआय अमोल तायडे सुरेश तायडे महासेन सुरडकर अनिल मोरे शेख अक्रम भीमराव वाघ सनी तायडे प्रीतम पालवे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

No comments:
Post a Comment