बाराबलुतेदार समाजातील सर्व लोकांना रेशन धान्याचा लाभ देण्यात यावा - MHL News

Breaking

Thursday, 23 January 2025

बाराबलुतेदार समाजातील सर्व लोकांना रेशन धान्याचा लाभ देण्यात यावा

 



महा.लोकसंवाद न्यूज (जळगाव)

मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)


बारा बलुतेदार समाजातील सर्व घटकांना मोफत रेशन धान्य लाभ देण्यात यावा या मागणीचे निवेदन अखिल भारतीय विश्वकर्मा महासभा या संघटनेच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दि.२२/१/२०२५ रोजी देण्यात आले 


याबाबत माहिती अशी की अखिल भारतीय विश्वकर्मा शिल्पकार महासंघ या संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील सर्व बारा बलुतेदार समाजातील जे कुटुंब रेशन धान्यापासून वंचित आहे या सर्व कुटुंबांना सर्व रेशनचे धान्य उपलब्ध होईल यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावरील जळगाव शहरी विभाग परिसरातील सर्व ठिकाणी विशेष मोहीम राबवून बारा बलुतेदार भटके समाजातील समूहातील जे कुटुंब धान्यापासून वंचित आहे त्यांना तेवढी धान्य उपलब्ध करून द्यावे यासाठी प्रयत्न व्हावे व यासाठी स्पेशल समिती गठीत करून त्वरित जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यावर विश्वकर्मा बारा बलुतेदार 


समाजातील सर्व कुटुंबप्रमुखांना सर्व वंचितांना रेशनचे धान्य उपलब्ध करून द्यावे यासाठी व या मागणीसाठी हे निवेदन देण्यात येत आहे


येणाऱ्या एका महिन्याच्या आत जर संबंधित कार्यालयाकडून या कामाविषयी जर हालचाल किंवा काम करण्याची सुरुवात न झाल्यास संघटनेच्या वतीने मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे 


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment