पाचोरा जळगाव दरम्यान परधाडे गावाजवळ मोठा रेल्वे अपघात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू तर 35 ते 40 प्रवासी जखमी - MHL News

Breaking

Wednesday, 22 January 2025

पाचोरा जळगाव दरम्यान परधाडे गावाजवळ मोठा रेल्वे अपघात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू तर 35 ते 40 प्रवासी जखमी

 


आज दिनांक २२ जानेवारी रोजी ४ वाजे दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये मोठा रेल्वे अपघात झाला हा अपघात  पाचोरा ते जळगाव दरम्यान परधाडे रेल्वे स्टेशन जवळ झाला 


सविस्तर माहिती अशी की आज चार वाजे दरम्यान मुंबई वरून येणारी पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या अफवेने काही प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या त्यादरम्यान आऊटसाईड करून येणारी बेंगलोर कर्नाटक एक्सप्रेस ने अनेक प्रवाशांना उडवले 


या अपघातामध्ये सात ते आठ प्रवाशांचा  मृत्यू झाल्याची माहिती मिळाली तर 30 ते 35 प्रवासी जखमी असून त्यांना जळगाव व पाचोरा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहे


तर काही प्रवाशांनावर पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलेले आहे

No comments:

Post a Comment