महा.लोकसंवाद न्यूज
तालुका प्रतिनिधी (बोदवड)
राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा, 2013 नुसार बोदवड तालुक्यात लाभार्थ्यांना धान्याचा लाभ दिला जात आहे. दारिद्र रेषेखालील व दारिद्र रेषेवरील शिधापत्रिकाधारकापैकी ग्रामीण भागात वार्षीक कौंटुबिक उत्पन्न मर्यादा ₹44,000/- पर्यंत व नागरी भागातील वार्षीक कौंटुबिक उत्पन्न मर्यादा ₹59,000/- पर्यंत असणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा समावेश करण्यात येतो. त्यानुसार
मोफत धान्याची आवश्यकता नसणारे, आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारे, नोकरीवर असणारे, निम सरकारी (शैक्षणिक संस्था, नगर पंचायत, पेन्शन धारक, पंचायत समिती चे धान्याचा लाभ घेणारे लाभार्थी) यांनी धान्याचा लाभ स्वत: हुन सोडावा. तसेच ज्याचे ग्रामीण भागात वार्षीक कौंटुबिक उत्पन्न मर्यादा ₹44,000/- पेक्षा जास्त व नागरी भागातील वार्षीक कौंटुबिक उत्पन्न मर्यादा ₹59,000/- पेक्षा जास्त असणाऱ्या लाभार्थ्यानी धान्याचा लाभ स्वत: हुन सोडावा.
आपण धान्याचा लाभ सोडल्यास गरजू / विधवा / दिव्यांग यांना लाभ देण्यात येईल. तरी बोदवड तालुक्यातील सधन लाभार्थी ज्यांचे उत्पन्न जास्त असेल त्यांना पुन्हा विनंती करण्यात येते की या आव्हानास प्रतिसाद द्यावा आणि धान्याचा लाभ स्वतःहून सोडावा.
असे आव्हान बोदवड येथील पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांनी केलेले आहे
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment