भुसावळ तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे धरणे आंदोलन - MHL News

Breaking

Monday, 3 March 2025

भुसावळ तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे धरणे आंदोलन

 


महा.लोकसंवाद न्यूज (जळगाव)

प्रकाश सुरवाडे (मुख्य संपादक)


आज दिनांक ३ मार्च रोजी भुसावळ तहसील कार्यालयासमोर काँग्रेस तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले 


याबाबत सविस्तर माहिती अशी की भुसावळ शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले ‌

निवेदनात असे नमूद करण्यात आले की . गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करा.

तसेच राज्यात शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही शेतकऱ्यांच्या घरात शेतातील माल आला की सरकार त्या मालाची परदेशातून आयात करतात सरकारच शेतकऱ्यांनाचा भाव पाडते त्यात कापूस तूर सोयाबीन मका अशा अनेक पिकांचा उत्पादन खर्च पण निघत नाही त्यात भर म्हणजे खते बी बियाणे शेती अवजारे यांच्यावर १८ टक्के कर लावला जातो.


त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो परीणामात. शेतकरी कर्जबाजारी व नैराश्यतुन आत्महत्या करतो.

राज्यातील शेतकऱ्यांच्या अशा गंभीर प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकरयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने संपूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन करण्यात येत आहे 


तसेच शेतकऱ्यांना संपुर्ण कर्ज माफी द्यावी 

कापूस तूर हरभरा या पिकांची खरेदी करावी 

शेतकरयांना लागणारे खते बी बियाणे किटक नाशके व औजारे यांना जीएसटी मुक्त करावे 

त्याचप्रमाणे पुणे येथील स्वारगेट बसस्थानकावर बसमध्ये एका तरुणीवर आत्याचार करण्यात आला यावर भाजपचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना पत्रकारांने माहिती विचारली असता त्यांनी अशा घटना घडत असतात असे वादग्रस्त वक्तव्य केले होते या वक्तव्याचा काँग्रेस तर्फे जाहीर निषेध करण्यात आला 


अशा मुजोर मंत्री यांचा मुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर राजीनामा घ्यावा अन्यथा भुसावळ शहर काँग्रेस व भुसावळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या विरोधात राजीनामा देत नाही तोपर्यंत साखळी उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे 


सदर निवेदनावर या कार्यकर्त्यांच्या सह्या आहे

शैलेश बोदडे भुसावळ तालुका अध्यक्ष 

रविंद्र निकम भुसावळ शहर अध्यक्ष 

राजु डोंगरदीवे जिल्हा अध्यक्ष घरेलु कामगार काँग्रेस 

संतोष साळवे भुसावळ शहर सरचिटणीस 

रामअवतार परदेशी शहर सचिव भुसावळ 

हमीद शेख शहर उपाध्यक्ष भुसावळ सुनील दांडगे शहर सचिव अमोल पाटील इत्यादींच्या निवेदनावर सजा आहे 


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment