महा.लोकसंवाद न्यूज
तालुका प्रतिनिधी (बोदवड)
दिनांक 8.4 .2025 वार मंगळवार पासून
बोदवड तालुक्यातील मुक्तळ येथे शंभर वर्षाची जुनी परंपरा श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सुरुवातीपासून प्रथम राम जन्मोत्सव व
पूर्वीपासून
प्रथम राम जन्मोत्सव
व गावातून दिंडी सोहळा पालखी सोहळा
नंतर एकादशी ते हनुमान जयंती दरम्यान रोज रात्री सामाजिक ऐतिहासिक व पौराणिक असे नाट्य सादरीकरन
व आता फक्त सामाजिक नाट्य साजरी केली जातात
हनुमान जयंतीच्या सकाळी साडेपाच ते सहा च्या दरम्यान नरसिंह उताराचे सॉंग काढले जाते व संध्याकाळी दिंडी सोहळादहीहंडीचा कार्यक्रमाने सांगता होते.
नंतर एकादशीच्या दिवशी रात्री नऊ वाजता श्रीराम प्रसादिक संगीत नाट्य मंडळ हे यावर्षी ही नाटके सादर करणे सुरू आहे
1 लौकिक घराण्याचा
2 दैव सामील मृत्यूला
3 फटाकळी
4 साधू मठाच गुपित
ही नाटके सादर या वर्षाच्या उत्सवात होत आहेत गेली शंभर वर्षाहून अधिक जुनी परंपरा व गाव उत्सव म्हणून जळगाव जिल्ह्यामधील प्रत्येक गावाची काही ना काही परंपरा व रूढी असतात पण मुक्तळ गावातील जुने सर्व मंडळींनी राम जन्मोत्सव सादर करण्याची वेगळी परंपरा कायम ठेवली प्रथम जांबवंत हनुमंत नरसिंह अवतार राम लक्ष्मण सीता ही सर्वे सोंग काढून उत्सव साजरा केला जात होता परंतु याच गावातील जुने सर्व कलाकार मंडळी बाळू बुवा यांनी व संदल बागवान शंकर धोबी तुकाराम टेलर शामराव टेलर भाऊराव पाटील राजाराम पाटील मनोहर लोहार साधू बुवा भवरीलाल जैन व असे गावातील बरेच जुने कलाकार यांनी व बाळूबुवा यांनी नाटके सादर करण्याची परंपरा कायम राहावी म्हणून गावाच्या मध्यभागी नाटकाचा वटा निर्माण केला व त्यावरती बजरंग बलीची स्थापना व मंदिर आहे
याच ठिकाणी पूर्वीपासून नाट्य सादर करण्याची परंपरा आहे आतापर्यंत मुक्तळ गावातील जुनी सर्व श्रीराम प्रसादिक संगीत नाट्य मंडळ यांनी सिंहाचा छावा तंट्या भिल सोन्याची द्वारका मनी मंगळसूत्र संत तुकाराम नटसम्राट गड आला पण सिंह गेला अशी बरीच नाट्य प्रत्येक वर्षी सादरीकरण करून यातून गावातील लोकांना एक वेगळा संदेश देण्याचे कार्य आजपर्यंत सुरू आहे सदर गावात चार दिवस नाट्य सादर करीत असताना गावातीलच नागरिक तरुण मुले व जुनी सर्व याला सहकार्य करून उत्सव पार पाडण्यासाठी धडपडत असतात प्रामुख्याने एक वेगळा संदेश देण्याचे काम व उत्सव सुरू राहावा यासाठी श्रीराम प्रसादिक संगीत नाट्य मंडळाचे चेअरमन श्री ब्रिजलाल भवरीलाल जैन व व्हॉइस मॅनेजर रामदास दयाराम पाटील
संचालक सुनील राजाराम पाटील
व गावातील आत्माराम पवार
व नरसिंह अवताराचे सोग विठ्ठल रामदास पवार हे घेतात सदर सोगाची निर्मिती जुने मयत तुकाराम वराडे यांनी केलेली आहे या उत्सवाला साजरा करण्यासाठी व उत्सव पूर्ण व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी गावातील सर्व समाजातील नागरिक तरुण मुले यात सहभागी होऊन चार दिवस वेगवेगळ्या भूमिका घेतात व उत्सव पार होत आहे

No comments:
Post a Comment